आॅनलाईन लोकमतबाराभाटी : ग्रामीण भागात अनेक खेड्यात कडधान्याची शेती करतात. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात कठाण माल पिकविला जातो. मात्र निसर्गाच्या प्रकोपाने २-३ दिवस ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कडधान्य (कठाण) पिकाचे नुकसान झाले आहे.धानपीक निघाल्यानंतर काही प्रमाणात जमीन ओली असते. तेव्हा द्विदल धान्य, कडधान्य लावल्या जाते व पिकविल्या जाते. सध्या काही भागात हरभरा, जवस, बटाणा, लाखोरी, पोपट, उळीद, मुंग, तुरदाळ अशा पिकांची मळणीची तयारी सुरू होती.कठाण माल अंगणात, शेतात, मोकळ्या जागेत वाळविला होता. अशातच हलका पाऊस पडला व हे कडधान्य ओले झाले. काही प्रमाणात खराबही झाले.अशा धान्यास योग्य भाव बाजारात मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पिकांचे संरक्षण करुनही नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक संकट सहन करावे लागेल.शेतमालाला पुरेसा भाव नाहीयावर्षी पीक बऱ्यापैकी असल्याने बाजारपेठेत व्यापारी वर्गाकडून पुरेसा भाव नाही. कमी दराचे भाव हरभरा-३० रूपये, गहू १२ रूपये, लाखोरी १५ रूपये, पोपट ३५ रूपये, उळीद ३८ रूपये, जवस ३५ रूपये, मूंग ४० रूपये, तूरदाळ ४० रूपये किलोप्रमाणे भाव मिळत आहे. असे शेतकरी सांगतात. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी जगत असून शासनाचे दुर्लक्ष आहे.
हलक्या पावसाने कडधान्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 21:47 IST
ग्रामीण भागात अनेक खेड्यात कडधान्याची शेती करतात. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात कठाण माल पिकविला जातो. मात्र निसर्गाच्या प्रकोपाने २-३ दिवस ढगाळ वातावरण व हलक्या पावसामुळे कडधान्य (कठाण) पिकाचे नुकसान झाले आहे.
हलक्या पावसाने कडधान्याचे नुकसान
ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : शासनाकडे मदतीची मागणी