अमरावती : अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील ग्राम जवखेड खालसा येथील एका अनुसूचित जातीच्या कुटुंबातील तीन सदस्यांची अमानुष हत्या करण्यात आली. या तिहेरी हत्याकांडाचे आरोपी अद्यापही फरार असून या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी येथील विविध दलित संघटनांच्या प्रतिनिधींनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शासनाने या प्रकरणाची दखल घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे.काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर कामुने यांना निवेदन देण्यात आले. जवखेड येथील संजय जाधव (४२), जयश्री जाधव (३८) व सुनील जाधव (१९) या एकाच कुटंबातील तिघांची अमानुष हत्या करण्यात आली. निवेदन देताना पी.एस.खडसे, गोपाळ मेश्राम, सुनील गजभिये, बापू बेले, वसंतराव गवई, संजय खडसे, अरुणा वाडेकर, निशा शेंडे, प्रल्हाद रंगारी, प्रभाकर शेंडे, चोखांद्रे, संजय भोवते, बी.जी. खोब्रागडे आदी उपस्थित होते.
तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ दलित संघटनांचे निवेदन
By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST