शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याण समिती सभेला विस्तार अधिकाऱ्यांची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:47 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती सुशीला कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला १४ पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी हजर नसल्याने सदस्य शरद मोहोड, गजानन राठोड व इतर सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरहजर अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ बजावण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सदस्यांची नाराजी, आंदोलनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विषय समितीची सभा शुक्रवारी सभापती सुशीला कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला १४ पंचायत समित्यांचे विस्तार अधिकारी हजर नसल्याने सदस्य शरद मोहोड, गजानन राठोड व इतर सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गैरहजर अधिकाऱ्यांना ‘शो कॉज’ बजावण्याची मागणी केली. अखेर सभापतींनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात यांना यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले.सभेत जि.प. २० टक्के सेस फंड निधी योजना, अनुसूचित जाती व मागास घटकांच्या वस्तीच्या कामाचा बृहत आराखडा, तीन टक्के दिव्यांग निधी, जि.प. सेस, ३ टक्के व ५ टक्के निधी खर्चाचा आढावा आदी मुद्दे पटलावर होते. मात्र, सभेच्या प्रारंभीच विस्तार अधिकारी हजर नसल्याने प्रश्नांचे उत्तर कोण देणार, असा सवाल शरद मोहोड, गजानन राठोड, सुनंदा काकड, अनिता अडमाते, सीमा सोरगे, रंजना गवई व पंचायत समिती सभापती अर्चना वेरूळकर आदींनी समाजकल्याण अधिकाºयांना केला. त्यांनी माहिती घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. याच मुद्द्यावर सभा स्थगित करण्यात आली.सभेला समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, निरीक्षक डी.जे. देशमुख, केशव बिजवे, शुभदा अढाऊ, सावन गवई, नरेंद्र दाभाडे, मेश्राम आदी अधिकारी उपस्थित होते.विस्तार अधिकारी हजर नसल्यामुळे सभा स्थगित केली. पुढील सभेला त्यांना उपस्थित राहण्याबाबत सीईओ, अ‍ॅडिशनल सीईओ यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.- प्रशांत थोरातसमाजकल्याण अधिकारीविस्तार अधिकारी यांचे विविध मागण्यांसाठी सभा व अहवाल बंद आंदोलन सुरू आहे. याबाबत सीईओंना कळविले आहे. समाजकल्याणची कामे येत नसली तरी ही जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत.- एस.एम. उमकविभागीय संघटकविस्तार अधिकारी संघटना