शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

दैनंदिन साफसफाईचे कंत्राट संस्थांऐवजी कंपनीला !

By admin | Updated: March 6, 2017 00:05 IST

शहरातील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट वेगवेगळ्या २२ कं त्राटदार वजा एजंसीला न देता ....

नवा निर्णय विचाराधीन : साखळी तोडण्यासाठीचे पाऊल, कंत्राटदारांमध्ये खळबळप्रदीप भाकरे अमरावतीशहरातील दैनंदिन साफसफाईचे कंत्राट वेगवेगळ्या २२ कं त्राटदार वजा एजंसीला न देता त्यासाठी एकाच नामांकित कंपनीला पाचारण करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. राष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबवून मल्टिनॅशनल कंपनीकडे शहर स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी सोपविण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या एकाच कंपनीकडे हे काम दिल्यास स्वच्छतेबाबतची ओरड थांबेल आणि नामांकित कंपनीवर जबाबदारी निश्चित करणे शक्यदेखील होईल, असा महापालिका प्रशासनाचा होरा आहे. तथापि हा एकांगी प्रस्ताव सभागृहाच्या पचनी पडणार नाही, अशी भीतीही प्रशासनातील काही धुरिणांनी व्यक्त केली आहे. ९ मार्चला नवे सत्ताधीश पदारुढ झाल्यानंतर या नव्या निर्णयावर चर्चा अपेक्षित आहे.विशेष म्हणजे महापालिका क्षेत्रातील साफसफाईवर वर्षाकाठी सुमारे १३ कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय महापालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या सुमारे ७०० स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च धरल्यास हा आकडा तब्बल २५ कोटींवर जाऊन पोहोचतो. महापालिकेच्या स्वच्छता कंत्राटावर अक्षरश: उड्या पडतात. महापालिकेच्या स्थापनेपासून कमी अधिक प्रमाणात त्याच चेहऱ्यांना कंत्राट दिली जातात. त्यासाठी प्रचंड अर्थकारण साधले जाते. त्यापार्श्वभूमिवर २२ प्रभागातील साफसफाईसाठी एकच कंपनी विचाराधीन असल्याने प्रभागनिहाय कंत्राट घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडण्याचे संकेत आहेत. साफसफाई कंत्राटाच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे अनेकांचे चांगभले होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सभागृहात एकाच कंपनीचा प्रस्ताव कितपत टिकाव धरेल, याबाबत राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. निविदा प्रक्रिया अडचणीतअमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच ४३ प्रभागांतील स्वच्छतेचे कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने २२ प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही प्रक्रिया आचारसंहितेत अडकल्याने जुन्याच कंत्राटदारांना तात्पुरती मुदतवाढ देण्यात आली. निवडणूक संपल्यानंतर नव्याने निविदा प्रक्रियेने वेग घेतला असताना साफसफाईचे कंत्राट एकाच कंपनीला देण्याचे सुतोवाच करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यमान परिस्थितीत सुरु असलेली निविदा प्रक्रिया अडचणीत आली आहे.जुन्यांना फॉलोआॅन की नव्याने ई-निविदा महापालिका निवडणुकीपूर्वी दैनंदिन साफसफाईसाठी ई-निविदा प्रक्रिया राबािण्यात आली. यात २२ प्रभागांपैकी १६ प्रभागांसाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक निविदा प्राप्त झाल्यात, तर उर्वरित सहा प्रभागांसाठी निविदा न आल्याने त्या प्रभागासाठी नव्याने निविदा प्रक्रिया करावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर अंतिम टप्प्यात पोहोचलेली निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल की, प्रभागनिहाय प्रत्येकी एक या कंत्राटदार या पद्धतीला फाटा देऊन एकाच कंपनीकडे शहर स्वच्छतेचे काम देण्यासाठी देशपातळीवरुन निविदा मागविण्यात येतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.प्रभागनिहाय २२ वेगवेगळ्या कंत्राटदारांऐवजी शहर स्वच्छतेची जबाबदारी राष्ट्रीयस्तरावर काम करणाऱ्या एकाच कंपनीला देण्याची बाब विचाराधीन आहे. त्याअनुषंगाने सर्वसमावेशक निर्णय घेण्यात येईल.- हेमंतकुमार पवार, आयुक्त ,महापालिका