शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूरला दहीहंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:42 IST

देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.

ठळक मुद्देहजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत

लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : देवी रुक्मिणीचे माहेर श्रीक्षेत्र कौंडण्यापूर येथे कार्तिक प्रतिपदेला सकाळी शासकीय महापूजेनंतर दुपारी ५.३० वाजता येथील गोकुळपुरीत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत दहीहंडीचा सोहळा पार पडला.आ. यशोमती ठाकूर, भाजप नेत्या निवेदिता चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या नवनीत राणा, पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका सीमा सावळे, दिनेश बूब, विलास इंगोले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष रीतेश पांडव, संदीप आमले, पंचायत समिती सभापती अर्चना वेरुळकर, उपसभापती लुकेश केने, सदस्य मंगेश भगोले, लढा संघटनेचे संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.कार्तिक पौर्णिमेच्या प्रतिपदेला पंढरीचा विठ्ठल अडीच दिवसासाठी कौंडण्यपूरला मुक्कामी असतो, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे विदर्भातून अनेक पालख्या व भजनी मंडळी कौंडण्यपूर येथे येऊन लाडक्या माउलींच्या चरणी नतमस्तक झाले. पांडुरंगावर वारकरी भाविकांची मोठी श्रद्धा असल्याने प्रतिपदेच्या सकाळीच येथे मुक्कामी असलेले वारकरींनी वर्धा नदीवर स्नान करून सकाळी ५ पासून मंदिरात दर्शनासाठी रांग लावली. मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दहीहंडीपूर्वी देवस्थानातील सभागृहात काल्याचे कीर्तन झाले. यानंतर सर्व भाविक भक्त गोकुळपुरीत एकत्र आले. दहीहंडीचे पूजन जगद्गुरू राजराजेश्वरचार्य स्वामी माउली यांनी केले. त्यानंतर दहीतीर्थ भाविकांना वितरित करण्यात आले.चोख बंदोबस्तपंधरवड्यात लाखो भाविक कार्तिक यात्रेला येतात. त्यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कुºहा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दहीहंडीला विशेष सुरक्षा होती तसेच दररोज पाच अधिकारी, १०० कर्मचारी व पोलीस मित्र आपली जबाबदारी पार पाडत असल्याचे कुºहाचे पोलीस निरीक्षक सुनील किणगे यांनी सांगितले.