शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाणांच्या धनस्रोतांवर ‘इन्कमटॅक्स’ची पडेल का नजर?

By admin | Updated: October 4, 2016 00:17 IST

शंकर महाराज यांच्या आश्रमांवर 'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाण यांच्या धनस्त्रोतांची चौकशी करणे हा नरबळी प्रकरणातील महत्त्वाचा तपासबिंदू ठरू शकेल.

कशासाठी हे ? : आयुष्याच्या सायंकाळी करोडोंची उलाढालअमरावती : शंकर महाराज यांच्या आश्रमांवर 'धनवर्षाव' करणाऱ्या दादा चव्हाण यांच्या धनस्त्रोतांची चौकशी करणे हा नरबळी प्रकरणातील महत्त्वाचा तपासबिंदू ठरू शकेल. पुण्याचे दादा चव्हाण यांनी पिंपळखुटा येथील शंकर महाराज यांच्या आश्रमात मोठ्या प्रमाणात अर्थदान केले आहे. त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर हे या 'अर्थदाना'ची गर्वाने 'मार्केटिंग' करीत असतात. पंढरपूर येथे शंकर महाराज यांच्या आश्रमासाठी कोट्यवधी रुपयांची जागा खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीची जबाबदारी दादा चव्हाण यांनी स्वीकारली होती. चव्हाणांनीच ही खरेदी केल्याची माहिती आहे. भक्तीच्या नावावर शंकर महाराजांच्या नजिक वावरणाऱ्या आणि पिंपळखुट्याच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या चव्हाणांना कोट्यवधी रुपयांच्या जमीनींच्या व्यवहारात इतका रस कशासाठी? आयुष्याच्या सायंकाळी ध्यानमग्न होण्याऐवजी कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारात गुंतणाऱ्या दादा चव्हाणांच्या अर्थस्त्रोतांचे ठावठिकाणे शोधणे या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे झाले आहे. शंकर महाराज यांच्या आश्रमात तगडी रक्कम दान करणाऱ्यांपैकी चव्हाण हे अग्रणी आहेत. ही रक्कम येते कुठून? त्यामागचे उद्देश काय? ही रक्कम मिळविण्यासाठी आश्रमाचा उपयोग केला जातो काय? कोट्यवधी रुपयांचे दान दिले जाते ते कशासाठी? या व्यवहारांचा पारदर्शक हिशेब ठेवला जातो काय? त्यापोटी नियमांनुसार शासनाला 'इन्कमटॅक्स' दिला जातो काय? की तो बुडविला जातो? बुडविल्यास कुणाच्या माध्यमातून? आदी प्रश्नांची उत्तरे लोकदरबारात यायलाच हवीत. चव्हाणांच्या स्त्रोतांचे उगम, व्यवहारांची गणिते आणि अदा केलेला कर यावर इन्कमटॅक्स खात्याने नजर ठेवल्यास, बऱ्याच गुपितांचे झरे उघउ होतील.