शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

‘बाबा, मला आत्ताच घ्यायला या..!’

By admin | Updated: October 5, 2014 22:56 IST

‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी

रूपालीचा फोन : सासरच्यांविरूध्द गुन्हा अमरावती : ‘बाबा..मला आत्ताच घ्यायला या, माझ्या जीवाला धोका आहे..’ २२ सप्टेंबरला उशिरा रात्री, मृत रूपालीने थूगाव पिंप्री येथे वडिलांना फोन करून स्वत:च्या स्थितीची कळकळीने कल्पना दिली होती. सासरी नांदण्याची रूपालीची अजिबात तयारी नव्हती. परंतु सासरच्या मंडळींनी दिलेल्या आश्वासनानंतर रूपालीची समजूत घालून इतर पालकांप्रमाणे रूपालीचे पालकही परतले. हीच त्यांची चूक ठरली. शेवटी, शारीरिक आणि मानसिक यातनांना कंटाळलेल्या रूपालीचा तिच्या सासरच्यांनी काटा काढलाच!‘लोकमत’च्या ५ आॅक्टोबरच्या अंकात ‘विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला’या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी अंजनगाव पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल केला. घटनेच्या चार दिवसांनी रूपाली तुरखडे हत्येप्रकरणी ठाणेदारांनी भादंविच्या कलम ४९८(अ),३०६, ३०४ (ब) नुसार गुन्हे नोंदवून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात केली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील थूगाव पिंप्री येथील लंगोटे कुटुंबातील लाडकी लेक रूपालीचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात अंजनगाव सुर्जी तालुक्यातील खोडगाव येथील सतीश तुरखडे याचेशी झाला. लग्नात लंगोटे कुटुंबाने सतीशला दीड लाख रूपये हुंडा दिला होता. परंतु अवघ्या सहा महिन्यांतच रूपालीचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. रूपालीच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, हौसमौज रूपालीच्या वाट्याला आलीच नाही.ठाणेदाराची भूमिका संशयास्पद २ आॅक्टोेबरला घरून बेपत्ता झालेल्या रूपालीचा मृतदेह घरापासून अवघ्या १ हजार मी. अंतरावरील अरूंद विहिरीत सापडल्यानंतर लंगोटे कुटुंबाने अंजनगाव पोलीस ठाण्यात रूपालीच्या सासरच्या मंडळींविरूध्द तक्रार दिली. परंतु येथील ठाणेदार गजानन पडघम यांनी तब्बल ४ दिवसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा तर ठाणेदारांचा प्रयत्न नव्हता? यातून ठाणेदाराला कुठला लाभ तर होणार नव्हता? असा संशय बळावतोे. त्यामुळे याप्रकरणातील ठाणेदाराची भूमिका तपासून पाहायला हवी.