पालकमंत्री योजनेची प्रेरणा : १५ लाखांच्या लोकसहभागातून १५ रस्ते साकारलेअमरावती : पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजनेतून नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील दाभा या गावातील सर्वच १० पादंण रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहे. दाभालगतच्या निंबोरा लाहे येथे ३, पाळा येथे २ रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. यासाठी लोकसहभागातून १५ लाख १० हजार रुपये एकत्रित केले गेले. दाभा हे राज्यातील पादंण रस्ते अतिक्रमणमुक्त प्रथम गाव ठरावे.दाभा येथे महाराजस्व अभियानांतर्गत २५ आॅगस्ट २०१५ रोजी तहसीलदार बी.व्ही.वाहूरवाघ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला सरपंच विलास कुंभलकर, उपसरपंच मुरलीधर आखरे, तसेच सदस्य व तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील अतिक्रमणात बुजलेले पाणंद रस्ते मोकळे करण्याविषयी चर्चा करण्यात आली. प्रवीण पोटे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली पालकमंत्री पाणंद रस्ते विकास योजना उपयोगी असल्याचे गावकऱ्यांचे एकमत झाले. शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपने आर्थिक लोकसहभाग दिला. यामधून गावातील १० पाणंद रस्ते आकाराला आले आहे. यापुर्वी या पांदन रस्त्याने बैलबंडी नेणे कठीण झाले होते. अतिक्रमणाने १५-१५ फूट बुजलेल्या रस्त्यांनी या योजनेत मोकळा श्वास घेतला. हल्ली २२-२२ फूट रुंदीचे पाणंद रस्ते निर्माण झाले आहेत.अफलातून योजनेनेच गावकरी एकत्रपाळा गावातील पांदन रस्ते अतिक्रमनात बुजले होते. महाराजस्तव अभियानाच्या बैठकीत पाणंद रस्ते मोकळे करण्याची संकल्पना शेतकऱ्यांनी उचलून धरली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. १० लाखांचा लोकसहभाग दिला. अवघ्या सहा महिन्यांत दाभा गावात १० पाणंद रस्ते पूर्ण झाले. पालकमंत्री पाणंद रस्ते विकास ही योजनेमुळेच हे शक्य होवू शकले, अशी प्रतिक्रिया दाभ्याचे तलाठी प्रदीप पिंपरकर यांनी दिली.
दाभा गाव पादंण रस्ते अतिक्रमणमुक्त
By admin | Updated: April 30, 2016 00:12 IST