शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

इंधन दरवाढ, महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:01 IST

महागाई विरोधात जे आंदोलन करत होते. तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, केंद्रात सत्तासुख भोगत असलेल्या भाजप सरकारला आता सत्तेतून हटविण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालवर धडक; केंद्रातील मोदी सरकारचा निषेध, सर्वसामान्यांना जगणे झाले कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेल, गॅस सिंलिंडरचे दर गगनाला भिडले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारचे जनहित विरोधी धोरण याला कारणीभूत आहे. शुक्रवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने  पालकमंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे  आदीच्या नेतूत्वात जिल्हा परिषदेपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा रॅली काढण्यात आली. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. महागाई विरोधात जे आंदोलन करत होते. तेच सरकार आज केंद्रात ७ वर्षांपासून सत्तेवर आहे. तेव्हा पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅस सिंलिडरचे दर होते. तेच दर आजघडीला गगनाला भिडले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेला जगण्याचा अधिकार द्यायचा आहे, केंद्रात सत्तासुख भोगत असलेल्या भाजप सरकारला आता सत्तेतून हटविण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्या जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित सायकल रॅलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या. यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मोदी सरकारवर रोष व्यक्त करीत कधी नव्हे एवढी इंधन दरवाढ आणि सिंलिडरचे दर सर्वसामान्याना दाखविण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून बुरे दिन जनतेला पाहावे लागत आहेत. त्यामुळे मोदी सरकारला धडा शिकविण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. यावेळी विभागीय आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.  रॅलीत सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, जयंत देशमुख, हरिभाऊ माेहोड, संजय मार्डीकर, प्रकाश काळबांडे, दयाराम काळे, महेंद्रसिंग गैलवार, सुरेश निमकर, गणेश आरेकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, नितीन गोंडाणे, प्रमोद दाळू, बबलू काळमेघ, सुधाकर खारोडे, प्रशांत वानखडे, सुरेश आडे, अनंत साबळे, प्रदीप देशमुख, गिरीश कराळे, राहुल येवले, सागर देशमुख, पंकज मोरे आदी सहभागी झाले होते. 

झेडपी सभापती-पोलिसात तू-तू, मै-मैविभागीय आयुक्त कार्यालयात सायकल रॅली पोहोचताच आयुक्ताकडे निवेदन देण्यास गेलेल्या निवडक शिष्टमंडळाला पोलिसांनी गेटमधून सोडले. परंतु काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखल्यावरून वातावरण तापले. अशातच झेडपी सभापती बाळासाहेब हिंगणीकर व गाडगेनगरचे पाेलीस अधिकारी चोरमले यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रकरणी ना. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी मध्यस्थी केली.

शहर काँग्रेसही आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भरमसाट वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याचा निषेध शहर कॉंग्रेसद्वारा शुक्रवारी सायकल रॅली काढून करण्यात आला.कॉंग्रेस शासनाच्या काळात सिलिंडरचे दर ३४४ रुपये होते, आता ते ९४२ वर पोहोचले आहेत. त्यावरची सबसिडीदेखील नाहीशी झाल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. इंधनावरील या महागाईच्या निषेधार्थ ही सायकल यात्रा काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले यांनी केले. गर्ल्स हायस्कूल चौकातून या सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. सकाळी १०.३० निघालेल्या सायकल यात्रेचा विभागीय आयुक्त कार्यालय ते इर्विन चौकमार्गे राजकमल चौकात समारोप झाला. यामध्ये कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक प्रदीप हिवसे, सलीम बेग, शोभा शिंदे, अनिल माधोगडिया, फिरोज खान, प्रशांत महल्ले, अब्दुल वसीम, सादिक शहा, भैयासाहेब  निचळ, नितीन कदम, सलीम मिरावाले, जावेद साबीर, प्रभाकर वाळसे, राजा बांगडे, नीलेश गुहे, राजेश ठाकूर, राजेश चव्हाण आदी सहभागी होेते.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर