शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डायलिसीससाठी तो करतो सायबर क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:46 IST

पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपचार करून घेतो.

ठळक मुद्देअमरावतीमध्ये गुन्हा : फेक कॉल करून अनेकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस निरीक्षक असल्याची बतावणी करून शहरातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला गंडा घालणाऱ्या एका आरोपीचा सायबर पोलीस शोध घेत आहेत. तो आरोपी डायलिसीससाठी पैसे नसल्याने सायबर क्राईम करतो. इतकेच नव्हे तर अटक झाल्यानंतर शासकीय आरोग्य यंत्रणेकडून उपचार करून घेतो. या पसार आरोपीला सायबर पोलीस अटक करणार आहे.पोलीस इन्सपेक्टर बोलतोय, असे सांगून रोशन दिलीप इंगळे (२९, रा. ज्योती कॉलनी) या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला सात हजारांनी गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अमित कांबळे व विष्णू गिरी (दोन्ही रा. पुणे) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४१९, ४२०, ३४, सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. ८ एप्रिल रोजी सायबर पोलिसांनी आरोपी विष्णू गिरीला अटक केली. तथापि, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अमित कांबळे हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा पूर्वेतिहास तपासल्यानंतर पोलीस चाट झाले.अमित कांबळे हा किडनीच्या आजाराने ग्रस्त असून, तो उपचारासाठी सायबर गुन्हे करतो. डायलिसीससाठी पैसे नसल्यामुळे तो फेक कॉल करतो. वेगवेगळी बतावणी करून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर स्वत:ला अटक करून घेतल्यानंतर पोलीस त्याला उपचारासाठी नेतात, त्याच्यावर सरकारी खर्चाने उपचार होतात, हा उद्देश ठेऊन अमित कांबळे गुन्हे करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.पुण्यात अनेक गुन्हेपुणे शहरात अमित कांबळेविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्याविरुद्ध अलीबाग व अहमदनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करण्यात तो माहीर आहे. काही वर्षांपूर्वी एका पोलीस अधिकाºयाला वरिष्ठ असल्याचे फोनवर सांगत त्याने तुरुंगातील कैद्यांना हलविण्यासंदर्भात सांगितले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली होती. अमरावतीमधील एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकालाही त्याने पोलीस इन्पेक्टर बोलत असल्याची बतावणी केली.फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दुसºयालाही अटक केली जाईल. तो उपचारासाठीच असे गुन्हे करतो.- कांचन पांडे, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर ठाणे

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम