शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विमा दाव्याचे २ लाख व्याजासह देण्याचे ग्राहक मंचाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:21 IST

विमा दावा नामंजूर करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेडने विधवा शेतकरी महिलेला २ लाख रुपये दसादशे १० टक्के व्याजासह द्यावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविधवा शेतकरी महिलेला दिलासा : नॅशनल इंशुरन्स कंपनीला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विमा दावा नामंजूर करणाऱ्या नॅशनल इंशुरन्स कंपनी लिमिटेडने विधवा शेतकरी महिलेला २ लाख रुपये दसादशे १० टक्के व्याजासह द्यावे, असे आदेश ग्राहक मंचाने दिले. ग्राहक मंचाच्या या निर्णयामुळे शेतकरी महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.मोर्शीतील लिलाबाई दिलीप सोनारे (४०) यांच्या पती शेतकरी होते. त्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत २०१५-१६ करिता नॅशनल इंशुरन्स कंपनी लि. चा दोन लाखांचा शासनाने विमा उतरविला होता. दरम्यान लिलाबाई यांचे पती दिलीप सोनारे यांची २३ आॅगस्ट २०१६ रोजी हत्या झाली. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी नॅशनल इंशुरन्स कंपनी ली.कडे विमा दावा सादर केला. मात्र, तो दावा 'रिजेक्ट ड्यु टू फॅमिली डिस्पुट मर्डर' या शेºयासह नामंजूर करण्यात आला. त्यामुळे लिलाबाई सोनारे यांनी २८ फेबु्रवारी २०१८ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक सरंक्षण कायदा १९८६ च्या कलम १२ अन्वये तक्रार नोंदविली. त्यामध्ये विरुद्ध पक्षाने विमा दाव्याची रक्कम २ लाख व्याजासह द्यावी, तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी ३० हजार रुपये व तक्रारीचा खर्च १५ हजार रुपये मिळावा, अशी मागणी तक्रारीतून केली. तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष एस.पी.देशमुख, सदस्या शुंभागी कोंडे व दिप्ती बोबडे यांच्या समक्ष दोन्ही बाजू पडताळणी केली. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर ग्राहक मंचाने १९ मार्च २०१९ रोजी निर्णय दिला. विरुद्ध पक्ष पूणे येथील नॅशनल इंशुरन्स कंपनी लि.तर्फे विभागीय व्यवस्थापकांनी तक्रारकर्त्यास विमा दाव्याची रक्कम २ लाख रुपये तक्रार दाखल झाल्याच्या दिनांकापासून दसादशे १० टक्के व्याजासह द्यावी, शारीरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून २० हजार रुपये द्यावे, तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये द्यावा, असे आदेशित केले. हा निर्णय सदस्या दिप्ती बोबडे यांनी घोषित केला. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. उदय क्षीरसागर व विरुद्ध पक्ष १ व २ कडून अ‍ॅड. नितीन बिजवे यांनी बाजू मांडली. या निर्णयामुळे विधवा शेतकरी महिलेला दिलासा मिळाला आहे.