शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मागील बारा महिन्यांपासून राणी विक्टोरिया, जॉर्ज किंगआसेगाव पोलिसांच्या कस्टडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 21:18 IST

अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे एक वर्षापूर्वी आढळलेले चांदीचे शिक्के अजूनही आसेगाव पोलिसांनी अचलपूर कोषागारात जमा केलेले नाहीत

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील असदपूर येथे एक वर्षापूर्वी आढळलेले चांदीचे शिक्के अजूनही आसेगाव पोलिसांनी अचलपूर कोषागारात जमा केलेले नाहीत. मिळाल्यापासून अवघ्या पंधरा दिवसांत कोषागारात जमा करण्याचा दंडक असतानाही ती चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलिसांनी वर्षभरापासून स्वत:कडेच ठेवली आहेत. आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या या चांदीच्या शिक्क्यांमध्ये राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंग यांची भावमुद्रा असलेल्या सिक्क्यांचा समावेश आहे. हेच राणी व्हिक्टोरिया, जॉर्ज किंग या नाण्यांच्या रुपाने मागील बारा महिन्यांपासून आसेगाव पोलिसांच्या कस्टडीत आहेत. असदपूर येथील कृष्णा म्हाला यांनी आपल्या मालकीचे जुने घर पाडले. या घराच्या मातीच्या ढिगाºयावर खेळत असलेल्या मुलांना चांदीचे पैसे आढळून आले. तेव्हा ३० मार्च २०१७ म्हाला यांनी या मातीत पैशांचा शोध घेतला. मातीत सापडलेली चांदीची १३० नाणी म्हाला यांनी आसेगाव पोलिसांच्या स्वाधीन केली. दरम्यान, अचलपूर एसडीओ डॉ. व्यंकट राहोड, ठाणेदार अजय आखरे, इतिहास अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांच्या भेटीदरम्यान चांदीची ८ नाणी परत आढळून आली. तेव्हपासून ही चांदीची १३८ नाणी आढळून आली. तेव्हापासून ही चांदीची १३८ नाणी आसेगाव पोलीस ठाण्यात पडून आहेत. असदपूर येथे सापडलेली चांदीची नाणी ऐतिहासिक मैल्यवान वस्तूत मोडतात. या अशा आढळून आलेल्या मौल्यवाण वस्तू, जिल्हा कोषागार अधिकाºयांची अनुमती घेऊन लगतच्या कोषागारात जमा कराव्या लागतात. पण आसेगाव पोलिसांनी या मौल्यवान वस्तू स्वत:कडेच ठेवल्या आहेत.कोटमौल्यवान वस्तुंमध्ये ही नाणी मोडतात. मौल्यवान वस्तू मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हा कोषागार अधिकाºयांची परवानगी घेऊन अचलपूर कोषागारात ती नाणी ठाणेदारांनी जमा करायला हवी होती. - भूपेंद्र खरपीकर, कोषागार अधिकारी, अचलपूरयासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाºयांना पत्र दिले आहे. मात्र, जिल्हा कोषागार 'त्या' चांदीच्या नाणी ठेवण्याची व्यवस्था नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागपूर येथील पुरातत्त्व विभागाला कळविले आहे. अद्याप निर्णय झालेला नाही.- अजय आखरे, ठाणेदार, आसेगाव पोलीस ठाणे