शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

बडनेऱ्यातील रस्त्यांना खड्ड्यांचा शाप

By admin | Updated: June 23, 2015 00:53 IST

सद्यस्थितीत बडनेरानगरीचा पायी फेरफटका मारला असता महापालिकेने रचलेले विकासाचे मनोरे एकामागोमाग एक कोसळत आहेत.

विकासाचे फक्त मनोरेच : कुठेच दिसेना पावसाळ्यापूर्वीचे नियोजन, निदान पॅचेस तरी भरा ! बडनेरा : सद्यस्थितीत बडनेरानगरीचा पायी फेरफटका मारला असता महापालिकेने रचलेले विकासाचे मनोरे एकामागोमाग एक कोसळत आहेत. पायी किंवा वाहनाने मार्गक्रमण करताना रस्त्यावरील एक-एक खड्डा चुकवावे लागतात. महापालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाची पार ऐशीतैसी झाल्याचे दिसते. कुठल्याही रस्त्याने गेले तरी खड्ड्यांचे जाळे आणि पावसामुळे साचलेले डबके हे दृश्य हमखास दृष्टीस पडते.१९८३ साली अमरावती महानगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासूनच बडनेऱ्याचा समावेश महानगरपालिकेत झाला. मात्र, इतकी वर्षे लोटूनही रस्ते विकासाबाबतीत बडनेरा शहराची पिछेहाट असल्याचे चित्र आहे. बडनेरा शहराला कायम पक्षपाती वागणूक दिली जाते, असा आरोप येथील रहिवासी करतात. अमरावती शहरातील जनतेप्रमाणेच बडनेऱ्यातील जनतादेखील कर भरते. मात्र, त्या तुलनेत त्यांची साधी डांबरीकरण, खडीकरणाच्या रस्त्याची अपेक्षाही पूर्ण होत नाही, असा आरोपदेखील केला जातो. बडनेरा शहरातील ज्या तुरळक रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यात आले, त्यांची आजमितीस प्रचंड दुर्दशा झाली आहे. महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांवर पॅचेस मारण्याचे काम करायला हवे होते. यामुळे खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले नसते. नव्या वस्तीतील पोलीस ठाण्याच्या मागील बाजूने जयस्तंभ चौकापर्यंतच्या रस्त्यावर पाण्याचे मोठे डबके सतत साचलेले असतात. या रस्त्यावर ठिकठिकाणी अशीच परिस्थिती आहे. या मार्गावर बाजारात जाणाऱ्यांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे गजानननगर, रामायणनगर, पवननगर परिसरातदेखील डबके साचले आहेत. परिसरात पक्के रस्ते झालेले नसल्याने खड्ड्यातूनच वाहतूक करावी लागते. राजेश्वर युनियन हायस्कूलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर पाण्याचे डबके साचले आहेत. आठवडी बाजार परिसरही खड्डामय झाला आहे. या मार्गावरून शाळकरी मुले ये-जा करतात. त्यांचा केव्हाही अपघात होऊ शकतो. जुन्यावस्तीतदेखील अशीच परिस्थिती आहे. तेलीपुरा चौकाजवळच डबके साचून आहे. गांधी विद्यालयाकडे जाणारा मार्ग, बारीपुरा परिसरातील रस्ते, मुस्लिम वस्त्यांमधील रस्त्यांवर ठिकठिकाणी डबकी साचलेली दिसतात. एकंदर स्थिती पाहता महापालिकेचे पावसाळ्यापूर्वीचे नियोजन बडनेरा शहरात कुठेही दिसत नाही. अपघात झाल्यास जबाबदार कोण ? पाण्याने भरललेल्या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नाही. आता शाळा सुरू होतील. विद्यार्थ्यांची वर्दळ वाढेल. अशा स्थितीत पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडल्यास आणि प्राणहानी झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल बडनेरावासीयांनी केला आहे. महापालिका आयुक्तांकडून अनेक अपेक्षाअमरावती महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार सांभाळताच आपल्या आगळ्या-वेगळ्या कार्यशैलीचा ठसा उमटविणारे चंद्रकांत गुडेवार यांच्याकडून आता बडनेरावासीयांना बऱ्याच अपेक्षा आहेत. निदान त्यांच्या कार्यकाळात तरी बडनेरा शहराला सापत्न वागणूक मिळणार नाही, अशी आशा येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. महापालिकेचाच एक भाग असलेल्या बडनेरा शहरातील गैरसोयी दूर करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यात रस्त्यांची समस्या प्रमुख आहे, असे म्हणता येईल. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांची डागडुजी झाली असती तर आजमितीस शहरवासीयांना हा त्रास सहन करावा लागला नसता.बडनेरा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यात पावसाचे पाणी साचून राहते. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अपघात घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. - प्रकाश डोंगरे, नागरिक.माझी जबाबदारी म्हणून पावसाळ्यापूर्वीच खड्ड्यांमध्ये पॅचेस मारून घेतले आहे. महापालिका प्रशासनानेदेखील याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडून अजिबात दखल घेतली जात नाही. - विजय नागपुरे,नगरसेवक, बडनेरा.बडनेऱ्यात रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे. शाळकरी मुलांसह इतरांना यामुळे धोका संभवतो. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. पावसाळ्यापूर्वीच नियोजन होणे गरजेचे होते. - प्रकाश बनसोड,नगरसेवक, बडनेरा.