शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ‘करन्सी’ची उत्सुकता शमलीच नाही

By admin | Updated: November 11, 2016 00:25 IST

आरबीआयकडून अमरावती शहरातील बँकांना दुपारी ४ वाजेपर्यंत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा प्राप्तच न झाल्याने नवीन ‘करन्सी’ कशी आहे,

दोन हजाराच्या एकाच नोटेचे वाटप : नोटा बदलून घेण्याकरिता बँकांमध्ये झुंबड, पोलीस बंदोबस्त तैनात अमरावती: आरबीआयकडून अमरावती शहरातील बँकांना दुपारी ४ वाजेपर्यंत पाचशे रुपयांच्या नव्या नोटा प्राप्तच न झाल्याने नवीन ‘करन्सी’ कशी आहे, हे पाहण्यासाठी उत्सुक ग्राहकांची पुरती निराशा झाली. पाचशे रूपयांच्या नव्या नोटा शहरात दाखल झाल्या नसल्याचे एसबीआय व महाराष्ट्र बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर दोन हजारांच्या नव्या नोटा एसबीआयला मिळाल्या असतानाही एकाच खातेदाराला दोन हजाराची नवीन नोट मिळू शकली. पतंप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोेटा बाद केल्याने कालपासून सगळे वातावरण ढवळून निघाले आहे. या नोटा बदलवून त्याऐवजी नव्या नोटा मिळविण्यासाठी गुरूवारी बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली होती. सलग दोन दिवस एटीएम सेवाही बंद असल्याने नागरिकांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी व नवीन करन्सी मिळविण्यासाठी बँकामध्ये धाव घेतली. अमरावती शहरात राष्ट्रीयीकृत, को.-आॅप. मिळून एकूण ५७ बँका आहेत. याबँकाच्या जिल्हाभरात शेकडो शाखा आहेत. त्यामुळे यासर्व बँकामध्ये जुन्या नोटा स्वीकारणे सुरु होते. बँकांजवळ हजार-पाचशे व्यतिरिक्त शिल्लक असलेल्या शंभर , पन्नास व दहा रुपयांच्या नोटा ग्राहकांना वाटप करण्यात आल्या. पोलीस बंदोबस्तात रुपयांचे वाटपअमरावती : ग्राहकांना वाटप करण्यात आल्या. एका ओळखपत्रांवर फक्त चार हजार रुपयांची मर्यादा असल्याने ग्राहकांची रीघ लागली होती. आरबीआयच्या परिपत्रकानुसार जारी अर्ज व ओळखपत्रासह उपस्थित ग्राहकालाच नोटा बदलून दिल्या गेल्या. ग्राहकांची गर्दी लक्षात घेता कुठलीही अनुचित घटना किंवा गैरसौय होऊ नये, याकरीता सर्व बँकांसमोर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. पोलीस बंदोबस्तात पैशांचे वाटप यावेळी करण्यात आला. ज्या ग्राहकाचे बँकेत खाते आहे. त्या खातेदारांना एका दिवसात दहा हजार व आठवडयाभरात २० हजारांचे विड्रॉल करता येणार असल्याने त्याकरिताही नागरिकांनी धाव घेतली आहे. सकाळपासूनच अनेक नागरिकांनी, महिलांनी व वयोवृध्दांनी बँकेत गर्दी केली होती. दिव्यांगदेखील रांगेत ताटकळत उभे होते. (प्रतिनिधी)