येनस येथील घटना : वडील आणि भावाला अटक नांदगाव खंडेश्वर : दारू पिऊन सतत धिंगाणा घालणाऱ्या तरूणाची पित्याने व सख्ख्या भावाने दगडाने ठेचून हत्या केली आणि त्यानंतर प्रेत विहिरीत फेकले. ही घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली. नीलेश जनार्दन देशमुख (२४) असे मृताचे नाव आहे. तर जनार्दन महादेव देशमुख (५१), दिनेश जनार्दन देशमुख (२१) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत नीलेशची येनस येथे पानटपरी आहे. मंगळवारी पानटपरी बंद ठेऊन नीलेश कुठे तरी निघून गेला. वडिलांनी त्याचा शोध घेतला असता तो शेतात विहिरीजवळ बसल्याचे आढळून आले. मद्यधुंद स्थितीत मुलाला पाहून वडिलांचा संताप अनावर झाला. सोबत आणलेले विष नीलेशला पाजण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
दगडाने ठेचून प्रेत विहिरीत फेकले
By admin | Updated: July 9, 2015 00:11 IST