शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी जीवनावश्यक वस्तूसांठी मार्केटमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी ...

अमरावती : तीन आठवड्यांच्या कठोर संचारबंदीनंतर रविवारपासून रोज सकाळी ११ पर्यंत मुभा देण्यात आल्याने जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. प्रशासनाद्वारा प्रमुख चौकांत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यात आला. काही ठिकाणी अशा व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करताना दिसून आले.

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारपासून जीवनावश्यक वस्तूसह भाजीपाला व दूध डेअरी आदी दुकानांना सकाळी ७ ते दुपारी ११ या कालावधीत सुरु ठेवण्यास मुभा दिलेली आहे. तीन आठवड्यांपासून जिल्हा लॉकडाऊन असल्याने रविवारी सकाळी आवश्यक ते सामान घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. याशिवाय मुख्य मार्गाच्या व्यतिरिक्त अंतर्गत भागात मनाई असलेली दुकानेदेखील सुरू होती. काही व्यापार संकुलाच्या आतील भागातील दुकाने सुरू असलेली आढळून आली. महापालिकेचा बाजार व परवाना विभाग तसेच अतिक्रमन विभागाच्या पथकांद्वारा अशा काही दुकांनावर कारवाया करण्यात आल्या.

महापालिका आयुक्त, उपायुक्त याशिवाय पोलीस आयुक्त व उपायुक्त यांनी प्रामुख्याने सर्वाधिक गर्दी असणाऱ्या चित्रा चौक व इतवारा भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व पथकांना आवश्यक ते निर्देश दिलेत.

बॉक्स

चित्रा चौक, भाजीबाजारात कोरोना चाचणी

नागरिकांची सर्वाधिक गर्दी राहणाऱ्या चित्रा चौक, इतवारा भागात भाजी विक्रेत्यांसह काही नागरिकांच्या महापालिकेच्या आरोग्य पथकाद्वारा रॅपिड अँन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय महापालिका व पोलीस पथकांद्वारा रस्त्यांवर व दुकांनामध्ये गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेताना आढळले. सकाळी ११ नंतर उघडी असलेल्या दुकांनांच्या संचालकांना तंबी देऊन बंद करण्यास फर्मावण्यात आले.

बॉक्स

रस्त्यावरील हातगाड्यांना पथकाचा मज्जाव

शहरात भाजीविक्रेत्यांना झोननिहाय जागा देण्यात आलेल्या असल्याने रस्त्यावर भाजीपाल्याच्या हातगाड्या लावण्यास महापालिकेच्या पथकाद्वारा मनाई करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने व अंतर्गत भागात हातगाडी विक्रेता दिसल्यास त्याला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले. याशिवाय या विक्रेत्यांनी कोरोना चाचणी करण्याविषयी सांगण्यात आले.

बॉक्स

सकाळी ११ नंतर फिरण्यास नागरिकांना मनाई

सकाळी ११ नंतर संचारबंदी लागू होत असल्याने रस्त्यावर दिसणाऱ्या नागरिकांना हटकण्यात आले. याशिवाय विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील करण्यात आली. विहित कालावधीनंतर सुरू असणाऱ्या दुकानांना महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनीदेखील तंबी देऊन बंद करायला लावल्याचे दिसून आले.