शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट नाईट सफारीला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:03 IST

मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढीस लागून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पाने नाइट सफारी सुरु केली आहे.

ठळक मुद्देबिबट्यांचे दर्शन : अकोट वन्यजीव विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढीस लागून स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी व्याघ्र प्रकल्पाने नाइट सफारी सुरु केली आहे. या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी पर्यटकांना दोन बिबट्याचे दर्शन झाले. अकोट वन्यजीव विभागांतर्गत जंगल सफारीला पर्यटकांची पसंती असल्याचे दिसून येते.ताडोबा, पेंच व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत पर्यटकांची संख्या वाढविण्यात माघारलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने आता नाईट सफारी उपक्रम सुरू करून उणिवा भरून काढण्यासाठीच्या उपाययोजना शोधल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी यांनी अकोट, सिपना व गुगामल वन्यजीव विभागांतर्गत नाइट सफारी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात नरनाळा अभयारण्यात नाइट सफारी सुरू झाली आहे. नरनाळ्यात वाघ, बिबट्यासह अन्य वन्यपशूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या तुलनेत मेळघाटात पर्यटक येत नसल्याचे वास्तव आहे. मेळघाटात पर्यटक आले, तर स्थानिक आदिवासींनादेखील रोजगाराचे दालन उपलब्ध होईल. हा उद्देश बाळगून व्याघ्र प्रकल्पाने नाईट सफारीची संकल्पना पुढे आणली आहे. नरनाळा अभयारण्याच्या बफर क्षेत्रातील शहानूर ते पालधरी, पालधरी ते अमोना असा जंगल सफारी मार्ग निश्चित झाला आहे. ही सफारी २० कि.मी. अंतराची असून, सायंकाळी ७.३० ते ११.३० तर पहाटे ४ ते ६.३० दरम्यान पर्यटकांना वन्यप्राणी बघता येतील.पहिल्या टप्प्यातील जंगल सफारीचा आनंद इंदूर येथील पर्यटकांनी घेतला. या पर्यटकांना दोन बिबट्यांसह सांबर, गवा, रानडुक्कर, हरिण, काळवीट आदी वन्यपशू बघता आले. नाइट सफारीचा शुभारंभ अकोट येथील न्यायमूर्ती अनिल सुब्रमण्यम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहायक वनसंरक्षक सुरेश खराटे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.९०० रुपयांत नाइट सफारीमेळघाटात नाइट सफारीसाठी ९०० रुपये मोजावे लागतील. यात ६०० रुपये जिप्सीचे, तर ३०० रुपये गाईडचे आकारले जातील. निवास व्यवस्थेसाठी दरदिवसाला १२०० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. नाइट सफारीमध्ये तीनपेक्षा जास्त जिप्सी राहणार नाहीत. येत्या दोन दिवसांत हरिसाल, तारूबांदा परिसरातील जंगलात नाइट सफारी सुरू होणार असल्याची माहिती एम.एस. रेड्डी यांनी दिली.मेळघाटात पर्यटकांची गर्दी वाढण्यासाठी नाईट सफारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातून स्थानिक आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल. जंगल सफारीचा आनंद घेऊन मेळघाटचे सौंैदर्य न्याहाळावे.- एम.एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.