शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते निर्मितीत वृक्षतोड परवानगी नियमांना फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:48 IST

राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरणात बेसुमार वृक्षतोेड सुरू आहे. मात्र, याला परवानगी देताना महसूल अथवा वनविभागाकडून नियमांचे पालन होत नाही. शेकडो वर्षांपूर्वीची झाडे सहजतेने सुरक्षित ठेवता येत असताना त्यांचीदेखील कत्तल केली जात आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकालीन झाडे कापली : बांधकाम विभाग, वनाधिकाऱ्यांचे चांगभलं

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरणात बेसुमार वृक्षतोेड सुरू आहे. मात्र, याला परवानगी देताना महसूल अथवा वनविभागाकडून नियमांचे पालन होत नाही. शेकडो वर्षांपूर्वीची झाडे सहजतेने सुरक्षित ठेवता येत असताना त्यांचीदेखील कत्तल केली जात आहे.महाराष्ट्र वृक्षतोड कायदा १९६४, महाराष्ट्र वृक्षतोड (शहरी भाग) कायदा १९७५, भारतीय वन कायदा १९२७ कलम ४१ व ४२, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम २२ ते २६ मधील तरतुदी, सन १९८९ मध्ये सर्व वनक्षेत्रपालांना अनुसूचित वृक्ष तोडीसाठी शासनाने प्रदान केलेले अधिकार, १ आॅगस्ट २०१७ रोजी शासनाने गैरअनुसूचित वृक्षतोडीसाठी वनक्षेत्रपालंना दिलेले अधिकार, जमिनीची मालकी सिद्ध करणारे ७/१२ उतारे, गावनमुना ११ मध्ये त्या सर्व वृक्षांची नोंद असल्याची खात्री केलेले अभिलेखे तपासून वृक्षतोडीची परवानगी देणे नियमावली आहे. परंतु वनाधिकाºयांकडून ७/१२ उतारे, गावनमुना ११ व २५ (१) तथा २५ (२) चे दाखले न तपासता कोट्यवधी वृक्ष तोडीची परवानगी गेल्या २९ वर्षापासून दिली जात आहे. हल्ली चांद्यापासून तर बांद्यापर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या नियंत्रणात राज्य व राष्ट्रीय महामार्गासह अन्य रस्ते निर्मिती, रूंदीकरणाची कामे वेगाने सुरू आहे. वरूड- पांढुर्णा महामार्ग, अमरावती- बडनेरा ते अकोला टी पॉर्इंटपर्यंत रस्ते सिमेंट कॉक्रिटीकरणात येणारी शेकडो वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे. बांधकाम विभागाच्या नियंत्रणात सुरू असलेल्या रस्ते निर्मितीत खासगी मालकीच्या क्षेत्रावर उभे असलेल्या अनुसूचित वृक्षतोडीसाठी वृक्ष अधिकारी व गैरअनुसूचित वृक्षतोडीसाठी महसूल अधिकाºयांची लेखी परवानगी अनिवार्य आहे. मात्र, रस्ते निर्मितीचे काम हे शासनाचे असल्याचे भासवून वृक्षतोडीची नियमावली गुंडाळली जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे.वनजमिनींवरील वृक्षतोडीला परवानगी कशी?सन १९६० ते २०१० पर्यंत विविध कायदे, नियम व योजनेंतर्गत वनजमिनीचे पट्टे रुपात लाखो हेक्टर जमिनी वाटप केल्या आहेत. परंतु या वनक्षेत्रावरील उभा झाडोरा, वृक्षांची नोंद ही ७/१२ उतारे, गावनमुना ११, २५ (१) व २५ (२) अन्वये त्यांची मालकी ही व्यक्ती किंवा संस्थेकडे वर्ग केल्याच्या नोंदी तपासल्या जात नाही. वृक्षतोडीचा प्रस्ताव आला की ‘व्यवहार’ होताच वन अधिकाºयांकडून नियमानुसार कागदपत्रे न तपासता वनजमिनींवरील वृक्षतोडीला परवानगी बहाल केली जाते.संबंधित यंत्रणेकडून एका वृक्षतोड परवानगीच्या मागे तीन झाडे जगविण्याचा करार झाला आहे. वृक्षसंगोपनासाठी ट्री गार्डची रक्कम जमा करण्यात आली. नियमावली तपासूनच वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत वृक्षतोडीला परवानगी देण्यात आली.- नरेंद्र वानखडे, उपायुक्त, महापालिका