शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

पिके कोमात, चिंतेचे ढग; पेरण्या धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत.

ठळक मुद्देसात दिवसांपासून ‘डॉट’, शेतकऱ्यांसमोर नवे संकट, ५० हजार हेक्टरमधील क्षेत्र प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात १ जुलैपासून पावसाची दडी असल्याने सुरुवातीला पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके पावसाअभावी कोमात गेली आहेत. याशिवाय पावसाच्या खंडाअभावी या आठवड्यात झालेल्या ९३ हजार हेक्टरपैकी किमान ५० हजार हेक्टरमधील पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने ७ जुलैनंतर पावसाची शक्यता सांगितली असली तरी एकूण स्थिती पाहता चिंतेचे ढग दाटून आले आहेत. जिल्ह्यात १० जूनला झालेल्या सार्वत्रिक पावसानंतर मान्सूनचे वेळेआधी आगमन झाल्याची शुभवार्ता हवामान विभागाने दिली. जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सरासरीच्या २२ टक्के पाऊस जास्त झाला. ९ व ११ जूनला जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाची नोंद झाली. शेतकऱ्यांनीदेखील मृग नक्षत्रात पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. पाऊस फक्त काही भागात विखुरल्या स्वरूपात झाला. जमिनीत आर्द्रता असल्याने पिकांना काही काळ तग धरली. आता पावसात खंड असल्याने व तापमानात वाढ झाल्याने कोवळ्या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे बळराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.पाऊस येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. काही भागातील जमिनीत ओल असल्याने बीजांकुर निघाले. मात्र, कमी आर्द्रतेच्या भागातील सोयाबीन बियाणे जमिनीत कुजायला लागले आहे.  

कोवळ्या पिकांवर माकडांसह वन्यप्राण्यांचे संकट सुरुवातीच्या टप्प्यात पेरणी झालेली पिकांना माकडांच्या टोळ्या व काही भागात हरिण, निलगाय आदी फस्त करीत आहेत. याशिवाय बीजांकुराचा वाणी आदी खुरपड्या फडशा पाडीत आहेत. हे नवे संकट शेतकऱ्यांना त्रस्त करीत आहे.  मेळघाटातील   शिवारांमध्ये पिकांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना व्यवस्थापन करावे लागत आहे.

पावसाअभावी वैरणटंचाईपावसाची ओढ असल्याने सध्या वैरणटंचाईचे सावटदेखील पशुपालकांवर आहे. सोयाबीनचे कुटार अलीकडे ब्रिकेटसाठी वापरली जात असल्याने वैरणटंचाईत भर पडली आहे. त्यातच सोयाबीनच्या हंगामात परतीच्या पावसामुळे कुटार खराब झालेले असल्याने पशुपालकांजवळ साठवणूक केलेली वैरण नाही. पावसाअभावी आतापर्यंत शिवारात, धुऱ्यावर चाऱ्याची उगवण झालेली नाही. 

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यांपर्यंत सोयाबीनची पेरणीमूग, उडीद आदी अल्प कालावधीतील पिके या आठवड्यानंतर बाद होतील. मात्र, १५ जुलैपर्यंत सोयाबीनची पेरणी करता येते. अधिकतम त्यानंतरही एक आठवड्यापर्यंत करता येईल. जुलैअखेरपर्यंत कपाशीची पेरणीदेखील करता येणार आहे. तूर त्यानंतरही पेरणी करता येईल, अशा परिस्थितीत सोयाबीनमध्ये आंतरपीक घेणे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती