शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्ण कारागिरांवर उपासमारीचे संकट

By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST

सराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधीची उलाढाल बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे.

व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान : तोडगा निघण्याची प्रतीक्षा अमरावती : सराफा बाजारात दररोज होणारी कोट्यवधीची उलाढाल बेमुदत संपामुळे ठप्प झाली आहे. व्यापाऱ्यांना कोट्यवधींचे नुकनास सहन करावे लागत आहे. मात्र, या संपाचा सर्वाधिक फटका सुवर्ण कारागिरांना बसला आहे. सराफा बंदमुळे कारागिरांचा रोजगार पूर्णपणे बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा बेमुदत संप कधी संपणार, असा प्रश्न कारागिरांसह त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावत आहे. सोन्यावरील उत्पादन शुल्कात एक टक्का आणि अबकारी करात झालेल्या वाढीमुळे सराफा व्यावसायिकांवर कराचा बोझा वाढला आहे. शासनाने वाढीव कर मागे घ्यावा, या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. त्यामध्ये अमरावती शहरातील सराफा व्यावसियाकांचाही सहभाग आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार सुवर्णकारागीर असून ते २०० ते ५०० रुपयापर्यंत रोजगार मिळवितात. त्या रोजदारीतून ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. याच व्यवसायावर सुवर्ण कारांगिरांच्या जीवनाचा गाडा चालतो. मात्र, मागील १० दिवसांपासून सराफा व्यापाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे कारागिरांच्या रोंजदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज हाती आलेले काम करून पैसे कमावणाऱ्या कारागिरांचा अचानक रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना कुटुंबीयांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न भेडसावत आहे. सोन्या-चांदीचा व्यवसाय करणारे व्यापारी वर्ग हे श्रीमंत आहेत, मात्र, सुवर्ण कारागिरांचे हातावर कमावणे असल्यामुळे त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. जिल्ह्यात जवळपास २ हजार कारागीर विविध सराफा व्यावसायिकांकडे काम करतात. दररोज २ ते ५ ग्रॅम सोन्याचे काम करून ते रोजगार मिळवितात. मात्र, या बंदमुळे सुवर्णकारागिरांचा दररोज सुमारे २५ लाख रुपयांचा रोजगार बुडत असल्याचे सुवर्णकार संघाचे म्हणणे आहे. गेल्या १० दिवसात व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे, त्यातच कारागिरांवरही उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)सुवर्णकारागिरांना या बंदचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे, हे खरे, मात्र, रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. - अजय तिनखेडे, अध्यक्ष, जिल्हा सुवर्णकार संघ. सराफा बंद असल्यामुळे पैशांची कमतरता भासत आहे. जवळ होता तेवढा पैसा आतापर्यंत कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहात गेला. आणखी काही दिवस सराफा व्यवसाय बंद राहिल्यास आमच्यावर उपासमारीचीच वेळ येणार आहे. - संदीप बहाळ, सुवर्ण कारागीर.