शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

‘निलाजऱ्या’विरुद्ध फौजदारी

By admin | Updated: May 30, 2017 00:12 IST

स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावतीला हरताळ फासून उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध एका ‘निलाजऱ्या’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली.

नवसारी परिसरात कारवाई : वडाळी परिसरात दंड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावतीला हरताळ फासून उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध एका ‘निलाजऱ्या’ व्यक्तीविरुद्ध सोमवारी फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली. उत्तर झोनचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक डी.पी.शिंदे यांनी याबाबत गाडगेनगर पोलिसांत कारवाईत अडसर निर्माण करणाऱ्यांविरुद्धही फिर्याद दाखल करण्यात आली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत महापालिका क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. महापालिका हद्दीतील कुठलीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाऊ नये म्हणून १२ हजारापेक्षा अधिक लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालये देण्यात आली. त्यावर आतापर्यंत १० कोटींपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. याशिवाय सामुदायिक व सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यानंतर शहर हागणदारीमुक्त घोषित केले. शौचालयांची सुविधा दिल्यानंतरही काही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. ज्या भागात लोक उघड्यावर शौचास जातात,अशा १६ जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्या १६ पैकी एक असलेल्या नवसारी परिसरातील मुक्त विद्यापीठ पॉवर हाऊस परिसरात सोमवारी उत्तर झोनचे गूड मार्निंग पथक पोहोचले. तेथे आर.एन.नाजूकधुर्वे हा व्यक्ती उघड्यावर जाताना आढळून आला. महात्मा फुले नगरातील अशोक इंगळे यांच्या घरी आपण पाहुणे म्हणून आल्याचे त्याने सांगितले. त्याबाबत इंगळे यांना विचारणा केली असता महापालिकेच्या पथकासोबत इंगळेसह सुनील नितनवरे यांनी वाद घातला. त्याअनुषंगाने तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत फौजदारी तक्रार करण्यात आल्याची माहिती उत्तर झोनचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक डी.पी.शिंदे यांनी दिली.उत्तर झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. याशिवाय वडाळी परिसरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या एका व्यक्तीकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. हमालपुरा झोनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. याच कालावधीत सहायक आयुक्त मंगेश वाटाणे यांच्या नेतृत्वात विटाभट्टी, फ्रेजरपुरा स्मशानात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. तथा नागरिकांना वैयक्तिक शौचालयासह सार्वजनिक, सामुदायिक शौचालयाचा वापराबाबत सक्त ताकिद देण्यात आली. महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार हे शहर स्वच्छतेसाठी कमालीचे आग्रही आहेत.आरएफओंना महापालिकेचे पत्र वडाळी वनपरिक्षेत्रातील पारधीपुरा, वीटभट्टी परिसरातील नागरिक वनक्षेत्रात उघड्यावर शौचास जात असल्याचे आढळून आले आहे. त्यादृष्टीने या भागात आपण आपल्या स्तरावर गूड मार्निंग, गुड इव्हेनिंग पथक गठित करावेत, असे पत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी पाठविले आहे. जे नागरिक उघड्यावर जाताना आढळून येतील त्यांच्यावर एफआयआर दाखल करावेत, अशी सूचना या पत्रातून करण्यात आली.