शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

-तर रिलायन्सविरुद्ध फौजदारी

By admin | Updated: February 7, 2015 00:10 IST

शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरु असून विवेकानंद कॉलनी परिसरात नियमांना डावलून खोदकाम केले जात आहे.

अमरावती : शहरात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरु असून विवेकानंद कॉलनी परिसरात नियमांना डावलून खोदकाम केले जात आहे. गुरुवारी या भागाचे नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी खोदकाम परवानगीची विचारणा केली असता रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी वाद घातला. ही बाब आयुक्तांच्या दालनात शुक्रवारी पोहचली तेंव्हा रिलायन्स कंपनीविरुद्ध फौजदारी करुन कंत्राटदारांना वठणीवर आणण्याचे निर्देश आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिले.मागील काही महिन्यांपासून रिलायन्स कंपनीचे ४ जी वेबसेवा पुरविण्याच्या अनुषंगाने शहरात केबल टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरु आहे. केबल टाकण्याची परवानगी ही शासन स्तरावरुन देण्यात आली असली तरी महापालिकेने अटी, शर्तीवर शुल्क आकारुन ही परवानगी दिली आहे. मात्र रिलायन्सने काही भागात नियम गुंडाळून केबल टाकण्यासाठीचे खोदकाम सुरु केले आहे. हे खोदकाम करताना दोन ते तीन महिन्यांपूर्वी करण्यात आलेले रस्ते, पेव्हिंग ब्लॉक बांधकामसुद्धा बाधा पोहचत आहेत.शहर अभियंत्यांनी घेतली तत्काळ बैठककेबल टाकताना खोदकाम नियमानुसार व्हावे, यासाठी रिलायन्स कंपनीची मुस्कटदाबी करण्यासाठी शुक्रवारी उशिरा सायंकाळी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षेखाली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांची बैठक पार पडली. यावेळी रिलायन्स कंपनीचे समन्वयक आनंद राऊत यांची कानउघाडणी करण्यात आली. सोमवारपासून खोदकामावर अभियंत्यांचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मालमत्तेचे नुकसान झाल्यास कंपनीविरुद्ध फौजदारी करू, अशी माहिती शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी दिली.फ्रेजरपुऱ्यात वीज गूलयेथील फ्रेजरपुऱ्यात रिलायन्स कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना अचानक जमिनीच्या आत असलेली विद्युत परिवठा करणारी तार तुटल्यामुळे परिसरातील वीज गूल झाली आहे. अचानक मोठा आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिक चक्रावून गेले. या भागाचे नगरसेवक अरुण जयस्वाल यांनी वीज गूल झाल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तब्बल चार ते पाच तासांनंतर वीजेचा पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.सोमवारपासून कामाचे अंकेक्षणअमरावती : लाखो रुपये खर्चून विकास कामे करीत असताना रिलायन्स कंपनी ही केबल टाकण्यासाठी खोदकाम करीत असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे, या अनुषंगानेच नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी रिलायन्स कंपनीच्या खोदकामाला विरोध करुन ते बंद पाडले. मात्र रिलायन्सच्या कंत्राटदारांनी प्रदीप हिवसे यांच्याशी वाद घातला. हे खोदकाम बंद पाडता येत नाही, शासन, महापालिकेची परवानगी असल्याचा तोरा दाखविला गेला. मात्र हिवसे यांनी खोदकामाचा नकाशा आणि कनिष्ठ अभियंत्यांना बोलवा त्यानंतरच हेच खोदकाम सुरु होईल, अशी ठाम भूमिका घेतल्याने रिलायन्सने घटनास्थळावरुन काढता पाय घेतला. हा प्रकार हिवसे यांनी शुक्रवारी आयुक्त डोंगरे यांच्या निदर्शनास आणून दिला. परिणामी रिलायन्सने खोदकाम करताना नियमांना गुंडाळले असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करु असे आश्वासन आयुक्त डोंगरे यांनी दिले. यावेळी नगरसेवक प्रदीप हिवसे, अमोल ठाकरे, अरुण जयस्वाल आदी उपस्थित होते.