शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

राज्यात १०० अटल आनंदवनांची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:17 IST

राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे.

ठळक मुद्देजपानमधील मियाबाकी धर्तीवर संकल्पना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यातील नगर परिषद, महापालिकांच्या ओपन स्पेसवर जपानमधील मियाबाकी जंगलाच्या धर्तीवर १०० अटल आनंदवनांची निर्मिती केली जाणार आहे. नागरिकांसाठी ती ऑक्सिजन पार्क असतील, तर पशूपक्ष्यांसाठी खऱ्या अर्थाने आनंदवन राहणार असल्याची माहिती राज्याचे वन, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.योजनेसाठी काही नगरपालिका पुढे आल्या आहेत. यामध्ये एक हेक्टर जागेत १२ हजार ५०० वृक्ष लागवड केली जाते. मंत्रिमंडळाची याला मान्यता देण्यात आलेली आहे. या वनासाठी मियाबाकी टेक्नॉलॉजी महत्त्वाची आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवनात ही संकल्पना सर्वप्रथम यशस्वी केली. आता राज्यात याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी समाजाने घ्यावी, यासाठी हरित सेना (ग्रीन आर्मी) ही संकल्पना आहे. यासाठी एक कोटींचे लक्ष्य आहे. सद्यस्थितीत ६० लाखांवर नोंदणी झालेली आहे. अमरावती विभागात १२ लक्ष उद्दिष्ट असताना, २७ मेपर्यंत ९,३८,५४६ नोंदणी झालेली आहे. यंदा १ ते ३१ जुलै या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचे लक्ष्यांक आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यापैकी ८७.८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.वृक्षलागवडीवर मॉनिटरिंंग करण्यासाठी नागपूर येथे कमांड रूम स्थापित करण्यात आलीे. देशाच्या निधी आयोगाने याचे कौतुक केले आहे. देशातील वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादनाबाबत फॉरेस्ट सर्र्व्हेे ऑफ इंडियाद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य क्रमांक एक वर आहे. वनेतर क्षेत्रामध्ये वृक्षाच्छादन २७३ चौरस किमीने वाढले आहे. कांदळ वनक्षेत्रामध्ये ८२ चौरस किमीने वाढ झालेली आहे. कोणत्याही विभागाच्या नियत व्ययातून ०.५ टक्के निधी वृक्षसंवर्धनासाठी वापरण्यास मुभा दिलेली आहे. आमदारदेखील या मिशनसाठी निधी उपलब्ध करू शकतात. जिल्हा नियोजनमधील विशिष्ट निधी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने जिल्ह्याधिकारी देऊ शकतात, असे मुनगंटीवार म्हणाले. पत्रपरिषदेला पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रमेश बुंदिले, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य संरक्षक अनुराग चौधरी, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल व वनविभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.‘त्या’ वृक्षाच्या कलमा शहीद स्मारकात लावणारमहात्मा गांधी यांच्या जयंतीचे हे १५० वे वर्ष आहे. वर्धेच्या कर्मभूमीतील सेवाग्राममध्ये गांधीजी साबरमती आश्रमापेक्षा जास्त काळ राहिले. या आश्रमात १९३९ मध्ये एक वृक्ष त्यांनी स्वहस्ते लावला होता. त्या वृक्षाच्या कलमा तयार करण्यात आल्यात. या कलमा आता राज्यातील ३३ कोटी वृक्षलागवड अंतर्गत प्रत्येक शहीद स्मारकात लावणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.अमरावती, अकोला विमानतळासाठी निधीअमरावती विमानतळाचे नाइटलॅन्डिंंग व रनवे यासाठी निधी उपलब्ध करणार आहोत. अमरावती येथे भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षणासाठी दोन वर्षांत १६ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयास पुरवणी व डिसेंबरमध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार