शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बालरोग ...

अमरावती : कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी म्युकरमायकोसिस आजाराचाही प्रादुर्भाव आढळला आहे. त्याअनुषंगाने ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यात ग्रामीण भागात हे प्रमाण वाढत आहे. तिसऱ्या लाटेसारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. ती रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. गेले वर्षभर आपण कोरोनाशी लढत आहोत. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांटची उभारणी होत आहे. या उपचार सुविधांत भर घालताना लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. मात्र, याचबरोबर नव्याने उभ्या राहणाऱ्या अडचणींवर आपण वेळीच मात केली पाहिजे. साथीबाबत जराही गाफील राहून चालणार नाही.

लहान मुलांना तिसऱ्या टप्प्यात अधिक धोका असल्याची तज्ज्ञांचे मत आहे. ते लक्षात घेऊन आवश्यक उपचार सुविधा उभारणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये लक्षणे दिसताच त्यांच्या आरटी-पीसीआर अहवालाची वाट न पाहताच उपचार सुरू करावेत. लहान मुलांसाठी सुसज्ज आरोग्ययंत्रणा उपलब्ध असण्याच्या दृष्टीने बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात यावा. म्युकरमायकोसिस आजाराचाही काही ठिकाणी आढळलेला प्रादुर्भाव पाहता ईएनटी तज्ज्ञांचाही समावेश असलेले पथक गठित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार

म्युकरमायकोसिस आजाराच्या जाणीव जागृतीबाबत मोहीम हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.या आजारावरील औषध महागडे असून, त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या एक हजार रुग्णालयांमध्ये या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

लक्षणे

ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे व त्यांचा मधुमेह नियंत्रित नाही, त्यांच्यामध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे लक्षण आढळून येत आहे. या आजारात नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका आढळून येतो. वेळेत उपचार न झाल्यास डोळे, श्वसन व मेंदूवर विपरीत परिणाम होऊ शकतो. या आजाराचे लवकर निदान होणे गरजेचे असते. या आजारामुळे कोरोना रुग्णांनी घाबरून न जाता मधुमेह असणाऱ्यांनी तो नियंत्रित ठेवावा. त्यासाठी व्यायाम, योग्य आहार व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे.