शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्याच्या नागरिकांनी केली मृत पर्यटकाच्या कुटुंबीयांना मदत

By admin | Updated: January 29, 2017 00:15 IST

देवदर्शनासाठी आलेली ती महिला कुठली कोण, लांबवरच्या ठाणे जिल्ह्यातील ते कुटुंब संकटात सापडले. परगावी येऊन

माणुसकीचा परिचय : ठाण्याला परतण्यासाठी वर्गणीतून गोळा केले २५ हजार रूपये नरेंद्र जावरे ल्ल चिखलदरा देवदर्शनासाठी आलेली ती महिला कुठली कोण, लांबवरच्या ठाणे जिल्ह्यातील ते कुटुंब संकटात सापडले. परगावी येऊन आपल्या कुटुंबातील सदस्य महिलेचे कलेवर घेऊन परतण्याची वेळ या पालवे कुटुंबावर आली. जवळ मोजकीच रक्कम मग, मृत महिलेचे पार्थिव नेण्याचीही पंचाईत. दु:ख अनावर होत असताना आर्थिक संकटातून कसे बाहेर पडावे, हा प्रश्नही उद्भवला. पण, चिखलदरावासियांनी पुन्हा एकदा माणुसकीचा परिचय दिला आणि तब्बल पंचवीस हजार रूपये वर्गणी केली आणि या दु:खी कुटुंबाच्या परतीची व्यवस्था करून दिली. ठाणे जिल्ह्यातील कसाराघाट येथील रहिवासी कल्पना संतोष पालवे (२८) ही महिला कुटुंबातील दहा ते बारा सदस्यांसह चिखलदरा पर्यटनस्थळावर आल्या होत्या. शुक्रवारी आलेल्या पालवे कुटुंबियांनी पूजाअर्चा केल्यानंतर तेथेच मुक्काम केला होता. कुलदैवताच्या पूजनानंतर रात्री निजलेल्या या कुटुंबाला सकाळी उठून मोठा धक्का बसला. लघुशंकेसाठी गेलेल्या कल्पना परत येत असताना चार ते पाच माकडे त्यांच्या मागे लागली. त्यामुळे त्या पळत सुटल्या व तोल जाऊन शंभर फूट दरीत कोसळल्या. दगडावर डोके आपटल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोजकेच पैसे जवळ असल्याने परत कसे जायचे, ही समस्या पालवे कुटुंबासमोर निर्माण झाली. मात्र, देवी पॉर्इंट संस्थानतर्फे दिनेश खापर्डे, हेमंत डोंगरे यांनी पंधरा हजार तर उर्वरित दहा हजार रूपये नगरसेवक अरूण तायडे, श्रीकृष्ण सगणे, राजेश मांगलेकर, विन्सेट चन्दामी, मनोज शर्मा यांनी गोळा केले. परतवाडा येथील शिवगणेश मंडळाच्या रुग्णवाहिकेसह सलीम न्यूज एजन्सीचे मो. सलीम यांनी वाहनाची व्यवस्था करुन दिली. अपघातांना बसेना आळा ४विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाचे सौंदर्य बघण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांच्या अपघाताच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. येथील भीमकुंड व पंचबोल पॉइंटकडे जाणारे रस्ते जिवघेणे ठरले आहेत. पर्यटकांसाठी पर्यटन महोत्सवावर लाखोंचा निधी खर्च केला जातो. मात्र, चिखलदऱ्यात भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यासाठी कोणतीच स्वतंत्र व्यवस्था येथे उपलब्ध नाही. माकडांचा वाढता हैदोस सुद्धा पर्यटकांच्या जिवावर उठल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे.