शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सीपींची रात्रकालीन गस्त, पाच अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:06 IST

शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आता रस्त्यावर उतरले असून ....

ठळक मुद्दे४० संशयित दुचाकी 'डिटेन' : पोलिसांची तारांबळ, काही रेकॉर्डवरील आरोपी निष्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक आता रस्त्यावर उतरले असून त्यांनी रविवारी दस्तुर नगर ते कंवरनगर मार्गावरील बार अ‍ॅन्ड रेस्टारेंटमध्ये धाड टाकून पाच गुन्हेगारांना अटक केली. रात्रकालीन गस्तीदरम्यान ४० संशयित दुचाकी पोलिसांनी 'डिटेन' केल्यात.पोलीस आयुक्तांची सिंघम स्टाईलमुळे पोलीस वर्तुळाचे धाडसीवृत्ती जागृत झाल्याचे दिसून आले. पोलीस आयुक्तांच्या धडक कारवाईमुळे पोलिसांची ताराबंळ उडाली होती. आयुक्तच स्वत: रस्त्यावर उतरल्यामुळे अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनीही कर्तव्यदक्षतेचे उदाहरण दिले. पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वात राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी यांनी सर्वप्रथम गजल बारवर धाड टाकून बारमधील ग्राहकांची चौकशी केली. यावेळी बारमध्ये पाच गुन्हेगार मद्यप्राशन करताना आढळून आले. पोलिसांनी पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यामधील काही जण हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस आयुक्तांनी रस्त्यावरून जाणाºया वाहनांची तपासणी करण्याचे पोलिसांना निर्र्देश दिले. यामध्ये विना क्रमाकांची काही दुचाकी पोलिसांनी 'डिटेन' केल्यात. या कारवाईत डीसीपी शशिकांत सातव, राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी, एपीआय राम खराटे, गुन्हे शाखेचे एपीआय गवंड, पाटील, पीएसआय राम गिते, राजेंद्र चाटे यांच्यासह आदी पोलीस उपस्थित होते.फे्रजरपुरा हद्दीत 'रुटमार्च'सण-उत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सोमवारी शहरातील काही भागांत 'रुटमार्च' काढला. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या नेतृत्वात शेकडो पोलीस कर्मचाºयांनी शिस्तीचे उदाहरण देत शहरात गस्त घातली. फे्रजरपुरा हद्दीत १० अधिकारी व १०० पोलीस कर्मचारी पथसंचलनात सहभागी झाले होते. असाच रुटमार्च २९ आॅगस्ट रोजी कोतवाली, ३० आॅगस्ट रोजी राजापेठ व ३१ आॅगस्ट रोजी भातकुली ठाण्याच्या हद्दीत काढण्यात येणार आहे.