शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सीपींच्या आकस्मिक भेटीचा संदेश अन् पोलीस शिस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 22:47 IST

नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट देणार असल्याच्या संदेशाने शनिवारी सर्वच ठाण्यांतील वातावरण अचानक शिस्तप्रिय दिसले. ठाणे तर चकाचक झाले, याशिवाय प्रत्येक टेबलावरील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. सीपींनी अधूनमधून आकस्मिक भेटीचे संदेश किंवा भेटी दिल्यास सर्वच ठाण्यातील कारभार सुधारल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देठाणे चकाकले : प्रत्येक टेबलावरील कर्मचारी कामात मग्न

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट देणार असल्याच्या संदेशाने शनिवारी सर्वच ठाण्यांतील वातावरण अचानक शिस्तप्रिय दिसले. ठाणे तर चकाचक झाले, याशिवाय प्रत्येक टेबलावरील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही चित्र पाहायला मिळाले. सीपींनी अधूनमधून आकस्मिक भेटीचे संदेश किंवा भेटी दिल्यास सर्वच ठाण्यातील कारभार सुधारल्याशिवाय राहणार नाही.पोलीस खाते शिस्तप्रिय आहे. मात्र, शहरातील काही ठाण्यांतील वातावरण गढूळ झाले आहे. पोलीस ठाण्यात शिस्तप्रिय वातावरण पाहणे, ही आता योगायोगाचीच बाब ठरते. शहर पोलीस विभागाचे 'लिडर तथा व्हिक्टर'च येणार असल्याच्या माहितीने शनिवारी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबेच दणाणले. सीपी कुठल्याही क्षणी ठाण्यात येऊ शकतात. त्यामुळे सर्व रेकॉर्ड योग्य करा, गुन्हेगारांचे रेकॉर्ड तयार ठेवा आदी सूचना प्रत्येक ठाण्याला मिळाली होती. सीपी काय पाहणार, काय दस्तऐवज मागणार याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे प्रत्येक ठाण्यातील पोलीस आपापली कामे नीट पार पाडत होते. अनेकदा काही कर्मचारी ड्रेस परिधान करून कर्तव्यावर येत नव्हते, टोपी घालत नव्हते, टेबल, खुर्च्या अस्ताव्यस्त, कुणी टेबलवर बसून गप्पा मारताना दिसायचे, तर काही वेळकाढू धोरणाने चहा-पानसाठी ठाण्याबाहेर पडत होते. मात्र, नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर येणार म्हटल्यावर पोलिसांची भंबेरी उडाली. त्यामुळे वेळकाढून व कामचुकारपणा करणारे पोलीससुद्धा खाकी ड्रेस परिधान करून टोपी हातात घेऊन शिस्तीत दिसून आले. सीपींच्या आगमनाची प्रतीक्षा करतानाच शहरात चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. गाडगेनगर, राजापेठ, फे्रजरपुरा व बडनेरा पोलीस वेळीच कामाला लागले. पोलिसांची पळापळ सुरू झाली. चेनस्नॅचर्सचा शोध सुरू झाल्याने बहुतांश पोलीस यंत्रणा कामी लागली. यात दिवस कसा निघून गेला पोलिसांना कळलेच नाही. त्यातच सीपीनीहीा आकस्मिक भेट दिली नाही.