शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या पूर्वसंध्येला गाय-बैलांना ठेवले कैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:22 IST

न्यु नागझिरा अभयारण्यातील राखीव वनक्षेत्रात येणाºया तलावात बैल, गाई, शेळ्या पाणी पित असताना ....

ठळक मुद्देबाम्पेवाडा येथील प्रकरण : वनविभागाची अमानवीय कारवाई, वनकर्मचाºयांकडून गुराख्याला मारहाण

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : न्यु नागझिरा अभयारण्यातील राखीव वनक्षेत्रात येणाºया तलावात बैल, गाई, शेळ्या पाणी पित असताना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी तिथून आणून या सर्व जनावरांना बंदिस्त करून ठेवले. पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या प्रकारामुळे या गावातील नागरिकांना आज बैलाअभावी पोळा हा सण साजरा करता आला नाही. या प्रकारामुळे बाम्पेवाडा गावानजीकच्या लोणारा या गावात आज पोळ्याच्या दिवशी असंतोष पसरला होता.दोन वर्षापूर्वी साकोली तालुक्यातील उमरझरी जंगलाला लागून असलेल्या जंगलाला न्यू नागझिरा अभयारण्य म्हणून शासनाने घोषित करण्यात आले. या अभयारण्याअंतर्गत बाम्पेवाडा व लोणारा या दोन्ही गावाच्या सिमेलगत रिसाला हे तलाव आहे. या तलावाचे पाणी शेतीच्या उपयोगासाठी लागू आहे. जनावरांसाठी मज्जाव करण्यात आला. पुर्वीपासून या तलावात गाई व म्हशी पाणी पिण्यासाठी ग्रामस्थ नेतात. न्यू नागझिरा अभयारण्य घोषित झाल्यापासून या तलावात जनावरांना नेण्यासाठी वनकर्मचारी गावकºयांना मज्जाव करतात.यावर्षी अत्यल्प पावसामुळे सर्वत्र पाणीटंचाई आहे. प्रत्येकच गावातील तलाव व बोड्यांमध्ये २५ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लोणारा या गावातील गुराख्यांनी जनावरांना पाणी पिण्यासाठी संरक्षित जंगलातील रिसाला या तलावात नेले. याची माहिती वनविभागाला होताच वनअधिकारी ताफ्यासह पोहोचले व शंभराहून अधिक जनावरांना बाम्पेवाडा येथे आणून त्यांच्या वन कार्यालयासमोर असलेल्या प्रियदर्शनी समाज मंदिर परिसरात कोंडून ठेवले. मात्र ग्रामपंचायतची परवानगी घेतली नाही. त्यानंतर शेतकरी बाम्पेवाडा येथे जावून आज पोळा सण आहे, त्यामुळे आमची जनावरे द्या, अशी विनंती केली. मात्र वनविभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे काहीएक एैकूण घेतले नाही. परिणामी आज पोळा असल्यामुळे शेतकºयांनी वनविभागाच्या कार्यालयात एकच गर्दी केली.या प्रकाराची चर्चा सर्वत्र वाºयासारखी पसरली. परिसरातील सर्व शेतकरी बाम्पेवाडा ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले. यावेळी बाम्पेवाडाचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी, वनक्षेत्राधिकारी व शेतकरी यांच्यात चर्चा झाली. मात्र वनअधिकारी कार्यवाहीवर अडून राहिले. शेवटी जि.प. सदस्य नेपाल रंगारी व शेतकºयांच्या मागणीवरून वनविभागाने ही जनावरे तीन वाजताच्या सुमारास गोपालकांना दिली. या दरम्यान गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोळा सणावर विरजणपोळयाच्या सणाला एक दिवसाआधी म्हणजेच रविवारला मोहबैली हा सण होता. यादिवशी सायंकाळी बैलांचे खांदे शेकण्याची परंपरा आहे. दुसºया दिवशी पोळा हा सण साजला केला जातो. मात्र बैल घरी न आल्यामुळे शेतकºयांनी आपल्या बैलांना पोळयात नेलेच नाही.चारापाण्याविना राहिली जनावरेकाल रविवार सायंकाळपासून ही जनावरे वनविभागाने आपल्या ताब्यात ठेवली. मात्र त्यांना चारा व पाण्याची सोय केली नाही. आज जनावरे चारण्यासाठी नेलेल्या उरकुडा शहारे रा.लोणारा गुराख्याला वनकर्मचाºयांनी काठीने मारहाण केली.कैदेतच दिला गाईने वासराला जन्मवनविभागाच्या कैदेत असतानाच एका गाईने रात्रीच्या सुमारास वासराला जन्म दिला. मात्र वनविभागाने याकडेही लक्ष दिले नाही. आणि गाईच्या मालकाला याची साधी सूचनाही दिली नाही.ग्रामपंचायतची परवानगी नाहीवनविभागाच्या अधिकाºयांनी जनावरे कोंडवाडयात ठेवण्याऐवजी ही सर्व जनावरे बाम्पेवाडा येथील समाज भवनात कोंडून ठेवली. हे करताना ग्रामपंचायतची कुठलिही परवानगी मात्र घेतली नाही.नागझिरा व नवेगांवबांध व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाºया जंगलात शासन नियमानुसार पाळीवप्राण्यांना आणण्यासाठी बंदी आहे. या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.- राजेंद्र सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक, न्यू नागझिरा.आमच्या शेतकºयांची शेती जंगलाला लागून आहे. जंगलातील वन्यप्राणी आमच्या शेताची मोठ्या प्रमाणात नासधुस करतात. परंतु या वन्यप्राण्यांना आम्हाला मारता येत नाही. दुसरीकडे यावर्षी अत्यल्प पावसामुळे पाणी नाही. अशास्थितीत आमची जनावरे जंगलात पाणी पिण्यासाठी गेली तर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वनविभागाची ही कारवाई निषेधार्ह आहे.- डॉ. नेपाल रंगारी, जिल्हा परिषद सदस्य.