शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोविड आयसीयू बेड धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

परतवाड्यातील बंद पडलेल्या कुटीर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या नावे ही उपचार व्यवस्था उभारली गेली आहे. या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रुग्णांकरिता ४० बेड लावण्यात आले, तर येथून पुढे त्याच आवारातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत १० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : मेळघाटसह अचलपूरकरिता बहुउपयोगी व्यवस्था दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कोरोना (कोविड-१९) च्या अनुषंगाने मेळघाटसह अचलपूर व लगतच्या परिसराकरिता महत्त्वपूर्ण, बहुउपयोगी अशी उपचार व्यवस्था एक महिन्यापासून दुर्लक्षित आहे. त्याअंतर्गत आयसीयूमधील दहा बेड धूळखात पडले आहेत.परतवाड्यातील बंद पडलेल्या कुटीर रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवर लाखो रुपये खर्च करून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या नावे ही उपचार व्यवस्था उभारली गेली आहे. या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ रुग्णांकरिता ४० बेड लावण्यात आले, तर येथून पुढे त्याच आवारातील ट्रामा केअर युनिटच्या इमारतीत १० बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यातील पाच बेडचा आयसीयू कक्ष उभारण्यात आला आहे. यात ऑक्सिजनची व्यवस्थाही आहे. मागील एक महिन्यापासून ही व्यवस्था उभी आहे. या आयसीयू युनिटला व्हेंटिलेटरची प्रतीक्षा आहे.कोविड-१९ च्या अनुषंगाने उभारल्या गेलेल्या या व्यवस्थेला आवश्यक डॉक्टरांसह परिचारिका व कुशल कर्मचारी वर्गाकरिता ट्रामा लगतच्या शासकीय वसतिगृहातील व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. कोविड रुग्णालयात राबणाऱ्या संभाव्य डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा विश्राम, निवासाकरिता ते वसतीगृह राखीव ठेवण्यात आले आहे. गरज भासल्यास त्यांच्या क्वारंटाईनकरिताही ही व्यवस्था विचाराधीन आहे.दरम्यान, कोविड रुग्णालयात केवळ फिव्हर क्लिनिक सुरू आहे. थ्रोट स्वॅब देण्याकरिता लोकांना अमरावती येथे पाठविले जात आहे. यात तेथे त्यांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे.एकीकडे परतवाडा शहरातील कोरोना बाधितांची संख्या चारवर गेल्याने होमक्वारंटाइन व इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन होणाºयांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर उपचाराला गती आली. थ्रोट स्वॅब घेतले जावेत यासाठी कोविड रूग्णालय कार्यान्वित करण्यात आले. मात्र दोन महिन्यानंतरही तेथे पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत.उपचार व्यवस्था सुरू करापरतवाड्यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार व्यवस्था सुरू करा. त्याकरिता आवश्यक डॉक्टर, कर्मचारी व साहित्य उपलब्ध करून द्या. थ्रोट स्वॅब घेण्याची व्यवस्था परतवाड्यात करा, अशी मागणी नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या