शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट रोखण्यासाठी पीएचसीमध्ये कोविड सेंटर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

अमरावती : कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर (पीएचसी) कोविड ...

अमरावती : कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर (पीएचसी) कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील वाढती रुग्णसंख्या आता कमी होत असली तरी कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तविला जात असून तिसऱ्या लाटेत बालक आणि युवकांमध्ये संक्रमणाची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशासनामार्फत उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालकांसाठी स्वतंत्र वार्ड कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आरोग्य यंत्रणा दिले आहेत. या सोबतच जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील ६० प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी काही केंद्रात कोरोना बाधित रुग्णांसाठी कोविड‌ केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात सुरू केले आहे.

कोट

कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी २० ते ३० पीएचसी स्तरावर कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

- डॉ. दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद

बॉक्स

तालुकानिहाय पीएचसीची संख्या

वरूड ६,मोर्शी ५,अंजनगाव सुजी ३,दर्यापूर ४,भातकुली ३,नांदगाव खंडेश्र्वर ५,तिवसा ३,अचलपूर ३,चांदूर बाजार ५,चांदूर रेल्वे ३,धामनगाव रेल्वे ४,चिखलदरा ५,धारणी ६ आणि अमरावती ५