शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या मोजणीत पाणंद रस्ताच केला गायब

By admin | Updated: July 20, 2014 23:59 IST

स्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून वाहितीचा पाणंद रस्ताच गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सुरेश सवळे - चांदूरबाजारस्थानिक भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातून वाहितीचा पाणंद रस्ताच गायब केल्याची घटना उघडकीस आली आहे.एकीकडे शासनाने शेतकऱ्यांना वाहितीला सोईचे व्हावे म्हणून पाणंद रस्ते मोकळे करण्याची मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे शासनाचे भूमिअभिलेख अधिकारीच या योजनेला तिलांजली देऊन शेताच्या मोजणीत या पाणंद रस्त्यांची विल्हेवाट लावताना दिसून येत आहेत. चांदूरबाजार येथील भूमी अभिलेख कार्यालयात स्वप्नील उंबरकर नामक भूमापक कार्यरत आहे. या भूमापकाने शेताच्या मोजणीदरम्यान इमामपूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील वाहितीचा पाणंद रस्ताच गायब करून शेजारच्या शेतात विलीन केल्याची किमया केली. ही बाब मूळ शेतमालक विनायक वाकोडे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी या भूमापकाने शेजारच्या शेतमालकासोबत अर्थपूर्ण व्यवहार करून चुकीची मोजणी केल्याचा आरोप केला. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही केली. याबाबतचे निवेदन त्यांनी भूमिअभिलेख संचालक, पुणे व भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षकांकडे दिले.मनोहर बिहुरे यांनी इमामपूर शेत शिवारातील २७/३ या शेताच्या मोजणीची मागणी केली होती. त्यानुसार विनायक वाकोडे यांना शेजारी शेतमालक म्हणून शेतात हजर राहण्याबाबत नोटीस दिली. भूमापक स्वप्नील उंबरकरकडे मोजणीची जबाबदारी सोपविली होती. परंतु त्यांनी चुकीची मोजणी करून वाकोडे यांच्या शेतातील वाहितीचा पाणंद रस्ताच बिहुरे यांच्या शेतात समाविष्ट करून टाकला. ही बा वाकोडे यांनी उंबरकर यांच्या लक्षात आणून देताच चूक कबूल करण्याऐवजी उंबरकर यांनी वाकोडे यांना धमकावून पोलीस कारवाईची धमकी दिल्याचा आरोप वाकोडे यांनी केला आहे. त्यांनी उंबरकरविरूध्द कारवाईची मागणी केली आहे. उंबरकर यांचे हे प्रकरण नवीन नसून यापूर्वीही जगन्नाथपूर येथील एका महिलेच्या शेताची मोजणी करताना त्यांनी या शेताचा काही भाग गावाच्या गावठाणमध्ये दाखविला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी त्याचा विरोध केला होता. या मोजणीत या महाशयांनी जिल्हा परिषद शाळेचे कंपाऊंड, प्रसाधनगृह, शाळेची खुली जागा व गावातील शासकीय पाण्याची विहीरदेखील त्या महिलेच्या शेतात दाखविली होेती, हे विशेष.