शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एकाच वेळी ८४ टेबलांवर मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 22:36 IST

लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर जिल्ह्याचा कौल कुणाला? याचा उलगडा २३ मे रोजी होईल. नेमानी गोडाऊनमध्ये एकाच वेळी सहा गोदामात विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यावेळी रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी होणार असून निकालास किमान १० तास लागण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा कौल, एक महिना प्रतीक्षा : व्हीव्हीपॅट चिठ्ठी पडताळणीने निकाल लांबणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर जिल्ह्याचा कौल कुणाला? याचा उलगडा २३ मे रोजी होईल. नेमानी गोडाऊनमध्ये एकाच वेळी सहा गोदामात विधानसभानिहाय प्रत्येकी १४ टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. यावेळी रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची मोजणी होणार असून निकालास किमान १० तास लागण्याची शक्यता आहे.अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी ११ लाख चार हजार ९३६ मतदारांनी मतदान केले. देशात सात टप्प्यात निवडणुका होत असल्याने सर्व मतदारसंघांत निवडणूक पार पडल्यानंतर २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सर्व मतदारसंघात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. अमरावती मतदारसंघात सर्वप्रथम टपाली मतपत्रिका मोजल्या जातील. यामध्ये मतदान कर्मचारी व सर्व्हीस व्होटर्सचे मतदान राहील. नेमानी गोडाऊनमधील सहा गोदामांत विधानसभानिहाय इव्हीएम ठेवण्यात आले आहेत. तेथे प्रत्येक गोदामात विधानसभानिहाय मतमोजणी होईल. या मतमोजणीचे प्रमुख संबंधित एआरओ राहतील. यासाठी प्रत्येक गोदामात १४ म्हणजेच सहा विधानसभा मतदारसंघाचे एकूण ८४ टेबल राहतील. या टेबलवर त्या मतदारसंघाची पहिली फेरी पूर्ण होईल. या प्रक्रियेला किमान एक तास लागणार आहे. त्यानंतर एकूण इव्हीएमप्रमाणे सर्व फेऱ्या आटोपल्यानंतर रॅण्डमली पाच व्हीव्हीपॅटची निवड करून त्यामधील मतदान चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येऊन इव्हीएमच्या मतांशी पडताळणी करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे निकाल स्पष्ट झाला तरी जाहीर व्हायला वेळ लागणार आहे.प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारीमतमोजणीसाठी एका विधानसभा मतदारसंघातील १४ टेबलवर प्रत्येकी दोन म्हणजेच सहा मतदारसंघांतील ८४ टेबलांवर १६८ कर्मचारी राहतील. यामध्ये एक सुपरव्हायझर व एक असिस्टंट असेल. तसेच किमान २० टक्के कर्मचारी राखीव राहणार आहेत. याव्यतिरिक्तही १०० अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी प्रक्रियेत राहणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.म्हणून मतमोजणीला विलंबयावेळी प्रथमच व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आलेला आहे. इव्हीएमबाबत मतदारांचा संशय दूर करण्यासाठी आयोगाद्वारा यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. एका फेरीतील सर्व मतांची मोजणी झाल्याशिवाय पुढील फेरी मोजण्यात येणार नसल्यानेही निकाल जाहीर होण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.मतमोजणीसंदर्भात प्राथमिक नियोजन झालेले आहे. आयोगाच्या सुचना आल्यास त्यामध्ये बदल होवू शकतो. विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणी होईल. प्रत्येक मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांची देखील मोजणी करण्यात येईल- शरद पाटीलउपजिल्हा निवडणूक अधिकारी