शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांना कुपोषणमुक्ती शक्य?

By admin | Updated: October 11, 2014 22:57 IST

अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे

अमरावती : अंगणवाडीतील बालकांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी राज्य सरकारने विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत मूठभर धान्य योजनेच्या माध्यमातून बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे व यातून कुपोषण टाळणे, हे काम आता अंगणवाडी सेविकांकडे सोपविले आहे. आधीच कामाचा ताण व त्यामध्ये नवीन योजनेची जबाबदारी याविषयी अंगणवाडी सेविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कुपोषणाचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी शासनाने मूठभर धान्य योजना आणली आहे. गावात फिरुन सेविकांना हे धान्य जमवायचे आहे. यापासून पोषाहार शिजवून बालकांना तो द्यायचा आहे. यासोबतच योजनेचे महत्त्व ग्रामस्थांना समजावून सांगणे, त्यांचे सहकार्य घेणे शासनाला अभिप्रेत यामुळे अध्ययनाच्या कामावर त्याचा परिणाम होणार आहे. राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात २३०० अंगणवाडीमधील बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील सुमारे १ लाखावर बालके आहेत. यापैकी ५ हजारांवर बालके कुपोषणाच्या विविध स्टेजमध्ये आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने हे प्रमाण कमी असले तरी चिंताजनक आहे. प्रकृतीने अशक्त असलेल्या मुलांना पोषक अन्नपदार्थ सध्या अंगणवाडीमधून पुरविले जात आहेत. या मुलांच्या आरोग्याचीही नियमित तपासणी करण्यात येते. या बालकांसाठी आवश्यक तो खाऊ अंगणवाडीत ठेवला जातो. ही सर्व कामे अंगणवाडी सेविकांना करावी लागतात. त्यामध्ये आता मूठभर धान्य योजनेची भर पडल्याने गावागावांत गटागटाचे राजकारण असून या योजनेला ग्रामस्थांचे कितपत सहकार्य मिळेल, त्यावर या योजनेचे भवितव्य अवलंबून राहील.