शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस केवळ ५२०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST

पान ३ ची लिड चांदूर बाजार : तालुक्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन उत्पादन करणारा शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची ...

पान ३ ची लिड

चांदूर बाजार : तालुक्यात दरवर्षी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन उत्पादन करणारा शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली. आता खुल्या बाजारात कापसाचे दर पडल्याने पेरणीपासून वेचणीला लागलेला खर्च निघणार कसा, या चिंतेने कापूसउत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. खासगी बाजारात कापसाला प्रतिक्विंटल केवळ ५२०० रुपये भाव मिळत आहे.

यावर्षी कापसाचे भाव वाढतील, या अंदाजाने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला, तर गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री सुरू केली आहे. चांदूर बाजार तालुका हा दर्जेदार कापसासाठी ओळखला जातो. या भागातील कापूस लांब धाग्याचा आहे. सोयाबीनने दगा दिल्याने यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र, यावर्षी सर्वच पिकांवर सुरुवातीलाच निरनिराळे रोग आले. कपाशी पिकावरसुद्धा रोगाचे सावट आले होते. यामुळे पेरणीपासून तर कापूस वेचणीपर्यंत शेतकऱ्यांना अवाढव्य खर्च आला आहे. तथापि, दर ५ हजार २५० रुपयांवर स्थिर असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गतवर्षी कापसाला मिळालेल्या दमदार भावामुळे जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनऐवजी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली.

असे आहेत दर

कपाशीला कमाल ५, ३२५ रुपये, तर किमान ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी चार ते पाच वर्षे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला. परंतु, पिकाला योग्य दर मिळत नव्हता. म्हणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड वाढविली. गतवर्षी ५ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिकचा भाव कपाशीला मिळाला. नंतर हे दर ६ हजार ५०० रुपयापर्यंत पोहोचले. मात्र, आता बाजारपेठेत कापसाचे भाव पडले आहेत. यावर्षी कापूस वेचणीसाठीसुद्धा मजुरांचे दर वाढल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कमी व खर्च अधिक करावा लागला. सबब, शेतीचे अर्थकारणच बिघडले.

----------------