शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कापूस ‘सेस’ वसुलीत लाखोंचा फटका

By admin | Updated: April 20, 2016 00:19 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या रक्कमेवर नव्हे तर गोणी (बोंद्री)वर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अमरावती बाजार समिती : व्यापाऱ्यांसोबत हातमिळवणीचा आरोेपअमरावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या रक्कमेवर नव्हे तर गोणी (बोंद्री)वर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कापसापासून वर्षाकाठी मिळणाऱ्या लाखोंच्या ‘सेस’ला मुकावे लागत आहे. हा एकप्रकारे बाजार समितीच्या आर्थिक स्त्रोतावरच घाला असून संचालक मंडळ शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचे हित जोपासत असल्याचे चित्र आहे. राज्य शासनाच्या सहकार, पणन, वस्त्रोद्योग विभागाच्या अधिसूचनेनुसार कापूस खरेदी योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितींना कापूस खरेदीसाठी बाजारशुल्क ठरवून देण्यात आले आहे. १०० रुपयांमागे किमान ५० पैसे तर कमाल १ रुपये या मर्यादेत शुल्क आकारणी करणे ही शासन नियमावली आहे. मात्र, बाजार समितीच्या संचालक मंडळाने १५ नोव्हेंबर २०१५ रोजी घेतलेल्या कापूस सभेत शेतकऱ्यांचे हित न जोपासता कापूस व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतला. बाजार समितीत कापूस प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांनुसार खरेदी केला जात असताना कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. संचालक मंडळांना कापूस व्यापाऱ्यांचा एवढा पुळका का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. कापसाच्या रक्कमेवर आकारल्या जाणाऱ्या ‘सेस’च्या माध्यमातून वर्षभरात लाखो रुपये गोळा होणे अपेक्षित होते. मात्र, तुरळक रक्कम गोळा झाल्याची माहिती आहे. बाजार समिती सभापती, उपसभापतींसह संचालक मंडळाने नियम गुंडाळून कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा प्रकार केला आहे. १६ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या कापूससभेत १८ पैकी किमान १० संचालकांची उपस्थिती अपेक्षित असताना केवळ ८ संचालकांच्या उपस्थितीत कापसाच्या गोणीवर ‘सेस’ आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील कलम ३१ (१) अन्वये शेतमालावर ‘सेस’ आकारता येतो. पंरतु शेतमालाच्या प्रक्रियेवर ‘सेस’ आकारता येत नाही. असे असतानासुध्दा बाजार समितीने कापसाच्या गाठींवर ‘सेस’ आकारला आहे. त्याकरिता बाजार समितीने उपविधीत बदल मात्र केला नाही. बाजार समितीचा कारभार चालविताना शासनाद्वारे निर्धारित नियमांचे उल्लंघन होत आहे. याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा बाजार समितीचे वाटोळे होण्यास अवधी लागणार नाही, अशी सहकार क्षेत्रात चर्चा आहे.