शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय कामात भ्रष्टाचार, चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:59 IST

अचलपूर पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी १०.१५ वाजता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी भेट दिली. या भेटीत अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळून आले.

ठळक मुद्दे१५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा : अचलपूर पं.स.ला झेडपी उपाध्यक्षांची आकस्मिक भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर पंचायत समितीमध्ये बुधवारी सकाळी १०.१५ वाजता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांनी भेट दिली. या भेटीत अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळून आले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश ढोमणे यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना दिले. शौचालय कामात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने सदर कामांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले.अचलपूर पंचायत समितीला दत्ता ढोमणे यांनी भेट देताच कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. घाईने कर्मचारी कार्यालयात एक एक होत पोहोचू लागले. कार्यालयात न पोचलेल्या अधिकाऱ्यांना मोबाईलद्वारे उपस्थित कर्मचाºयांनी लवकर येण्याचा निरोप दिला. ११.३० वाजोपर्यंत १५ अधिकारी-कर्मचारी लेटलतीफ आढळले. रोजच्या कामात तालुक्यातील आदिवासी भागात सुरू असलेल्या रोहयोच्या कामावरील गौण खनिजच्या रॉयल्टी पावत्या दाखविण्याचे आदेश त्यांनी दिले.शौचालयाचे पैसे परस्पर काढलेतालुक्यातील शौचालयाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. लाभार्थ्याला शौचालय मंजूर झाल्याची माहिती न देता त्याची रक्कम परस्पर काढण्यात आल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्याचे उपाध्यक्ष दत्ता ढोमने यांनी सांगितले. शौचालय लभार्थ्यांची रक्कम संबंधितांनी सदर सचिवाला देऊन शौचालयाची कामे ठेकेदारी पद्धतीने नियमबाह्य केली आहे.उपाध्यक्ष सकाळी १० वाजता कार्यालयात आले असता १५ अधिकारी-कर्मचारी उशिरा आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.- बाळासाहेब रायबोले,बीडीओ, पंचायत समिती, अचलपूर