शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नगरसेविकांच्या पतींनी घेतली स्वच्छतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:03 IST

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नगरसेविकांच्या पतींनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्याअनुषंगाने या पती महाशयांच्या जबाबदारीत शतपटीने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपहिल्या रांगेत उपस्थिती : ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी

आॅनलाईन लोकमतअमरावती : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नगरसेविकांच्या पतींनी स्वच्छतेची शपथ घेतली. त्याअनुषंगाने या पती महाशयांच्या जबाबदारीत शतपटीने वाढ झाली आहे. नगरसेविका पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आता स्वच्छतेचा आग्रह धरावा लागणार आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील यशाचा मार्ग सुकर झाल्याची प्रतिक्रिया सत्ताधीशांमध्ये उमटली आहे.स्वच्छ सर्वेक्षणाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर भारत गणेशपुरे यांनी ३० नोव्हेंबरला दुपारी ४ च्या सुमारास महापालिकेतील डॉ.आंबेडकर सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांशी संवाद साधला. मात्र या संवादपर्वाला बहुतांश नगरसेवकांनी हजेरी न लावल्याने त्यांची कसर नगरसेविकांच्या पतीने भरून काढली. महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांसाठी राखीव असलेल्या पहिल्या रांगेत या नगरसेविकांच्या पतींनी खुर्च्या पटकावल्या. मुळात गणेशपुरे यांच्यासमोर सभागृह भरल्यासारखे दिसावे, यासाठी प्रशासनानेही नगरसेविकांच्या पतींना ससन्मान पहिल्या व दुसºया रांगेत बसविले. हा कार्यक्रम नगरसेवकांसाठी असताना भाजपच्या नगरसेविका प्रमिला जाधव यांचे पती गजानन जाधव हे पहिल्या रांगेतील खुर्चीत जावून बसले. राजू कुरील, सुनील जावरे या नगरसेविका पतींनीही सभागृहात उपस्थित राहून सजग अमरावतीकरांची प्रतिमा उंचावली. गजानन जाधव थेट बबलू शेखावत आणि विलास इंगोले पहिल्या रांगेतील ज्या खुर्चीवर बसतात, तेथे स्थानापन्न झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र ते सत्तेतील नगरसेविकांचे पती असल्याने त्यांना हटकण्याची कुणाचीही बिशाद झाली नाही. काहींनी खासगीत नगरसेविकांच्या पतींची सभागृहातील उपस्थितीबाबत नाराजी दर्शविली. आमच्यामुळे प्रशासन व सत्ताधिशांची बूज राखल्या गेल्याचा दावा करण्यात आला. उपस्थिती दर्शविण्यासाठी महापालिकेच्या बहुतांश कर्मचाºयांना सभागृहात बोलावले.शपथ अन् मार्गदर्शनहीशहर स्वच्छ राहावे आणि स्वच्छ सर्वेक्षणात शहर अग्रमानांकित व्हावे, यासाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर भारत गणेशपुरे यांनी नगरसेवकांना धडे दिले. त्या दरम्यान स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगरसेविकेचे पती गजानन जाधव, सुनील जावरे, राजू कुरील यांनीही शपथ घेतली. स्वच्छतेविषयक मार्गदर्शन ऐकले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत या नगरसेविका पतींची नैतिक जबाबदारी वाढली आहे.