शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Amravati; अमरावती जिल्ह्यात कोरोनाने हिरावले ५१ बालकांचे पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 21:21 IST

Amravati news कोरोनाने ५१ बालकांचे पालक हिरावले. यामध्ये ४८ जणांनी वडील, सहा जणांनी आई, तर तिघांनी आई-वडील दोघेही गमावले आहेत. अशा निराधार झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणा व कृती दलाद्वारे जिल्हा प्रशासनास उपलब्ध केली. या बालकांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे काळजी घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे माता, पिता किंवा दोन्ही हिरावले गेले, त्यांना शासनाकडून १,१०० रुपये दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोनाने ५१ बालकांचे पालक हिरावले. यामध्ये ४८ जणांनी वडील, सहा जणांनी आई, तर तिघांनी आई-वडील दोघेही गमावले आहेत. अशा निराधार झालेल्या बालकांची माहिती आरोग्य यंत्रणा व कृती दलाद्वारे जिल्हा प्रशासनास उपलब्ध केली. या बालकांच्या यथायोग्य संगोपनासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे काळजी घेतली जाणार आहे.

जिल्हा बाल कल्याण अधिकारी भूषण भंडांगे यांच्या मार्गदर्शनातील पथकाद्वारे मुलांचा शोध घेण्यात आलेला आहे. यातील सर्व बालके हे काका,काकू, आजी, आजोबा, मामा, मामी आदींकडे सध्या वास्तव्याला असल्याचे दिसून आले. अनाथ झालेली तीन मुले आजी-आजोंबाकडे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ही मंडळी जर या बालकांना ठेवावयास तयार नसतील, तर त्यांना रुक्मिणीनगर व देसाईनगरातील बाल संगोपनगृहात ठेवण्यात येणार असल्याचे भडांगे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूमुळे अनेक बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. अशा बालकांची काळजी व संरक्षण करीत त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन, त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी जिल्ह्यात कृती दल गठीत करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल समितीच्या निर्देशानुसार कोरोना प्रादुर्भाव काळात बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील मुले तसेच कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यात येणार आहे.

पिता गमाविलेले बालके : ४१

आई हिरावलेली बालके : ०६

आई-वडील दोघेही मृत झालेली बालके : ०३

असा घेतला गेला बालकांचा शोध

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गावातील ग्राम समिती, अंगणवाडी सेविकांच्या गृहभेटीद्वारे तसेच ५० वर्षांपर्यंतच्या मृत व्यक्तींचा डेटा जमा करण्यात आला. यानंतर त्या कुटुंबांशी संपर्क करण्यात आल्याचे बाल कल्याण अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील अशी सर्व बालके सुरक्षित आहेत व जर त्यांना सांभाळ कोणी करीत नसल्यास त्यांना बाल संगोपनगृहात ठेवले जाणार आहे.

दरमहा १,१०० रुपयांची मदत

कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांचे माता, पिता किंवा दोन्ही हिरावले गेले, त्यांना शासनाकडून १,१०० रुपये दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण होईतोवर या बालकांना ही मदत मिळेल. यासाठी मृत पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र, मुलाचा रहिवासी दाखला, छायाचित्र, आधार कार्ड व तहसीलदारांचे प्रमाणपत्र व बँक खातेक्रमांक द्यावा लागणार आहे.

कोरोना संसर्गामुळे ५१ बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला. टास्क फोर्सद्वारे या मुलांचा शोध घेण्यात आला. या बालकांच्या यथायोग्य संगोपनाची काळजी घेतली जाणार आहे.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस