लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत आता जिल्ह्यातील १८ वर्षांवरील १३ लाख ५ हजार ४६ युवकांचे १ मे पासून लसीकरण होणार आहे. यापूर्वीचे पहिल्या डोजचे ३३.८३ व दुसऱ्या डोजचे ७.८१ टक्के असे ४१ टक्के टार्गेट जिल्ह्यात पूर्ण झाले. ही टक्केवारी बरीच मोठी राहिली असती, मात्र लसींचा पुरवठा नियमित होत नसल्यामुळे अर्धेअधिक केंद्रे बंद राहण्याची वेळ ओढवलेली आहे.जिल्ह्याला ५,८७,४८० टार्गेट असताना आतापर्यंत २,४२,६८४ व्यक्तींचे लसीकरण झाले. यात १,९८,७६८ व्यक्तींनी पहिला, तर ४५,९०६ व्यक्तींनी दुसरा डोज घेतले. आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. काही डोस वायादेखील गेले.जिल्ह्यात चार टप्प्यात लसीकरण होत आहेत. त्यानुसार हेल्थ केअर वर्कर २८,५८३, फ्रंट लाईन वर्कर २५,९४७, ४५ वर्षांवरील कॉमार्बिटीज ७१,६७३ व ६० वर्षांवरील १,१६,४७१ व्यक्तींनी लस घेतली. आता १८ ते १९ वयोगटात २८,३३६ व २० ते २९ वयोगटात ४,४८,०९६ तसेच ३० ते ३९ वयोगटात ५,३२,९७० व ४० ते ४५ वयोगटात २,६६,४.८५ या व्यक्तींचे लसीकरण येत्या १ मेपासून जिल्ह्यात सुरू करण्यात येणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
लसींच्या साठ्याचा हवा नियमित पुरवठा जिल्ह्यात आतापर्यंत २,०७,९८० कोविशिल्ड, तर ५४,९२० कोव्हॅक्सिनचे व्हायल प्राप्त झाले. जिल्ह्यातील १२५ केंद्राद्वारे लसीकरण करण्यात येत आहे. तीन दिवसांपूर्वी मिळालेले २० हजार डोज सद्यस्थितीत संपल्याने जिल्ह्यातील बहुतांश केंद्र बंद आहेत. गुरुवारी रात्रीपर्यत काही डोज मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
लसीकरणात ज्येष्ठच समोरजिल्ह्यात आतापर्यंत १,१६,४७१ ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण झालेले आहे. त्या तुलनेत अन्य तीन प्रकारात कमी लसीकरण झाले आहे. यामध्ये शहरी भाग आघाडीवर आहे.
शहरी भागात वाढणार केंद्रेशहरी भागात अधिक लाभार्थी असल्याने लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२५ केंद्रे आहेत. यात आणखी ५० केंद्राची भर पडणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
४५ वयोगटात ७१,६७३ लसीकरण या वयोगटात ६८७८९ व्यक्तींनी पहिला डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड ५१,०३६ व कोव्हॅक्सिनचा १७,७५३ व्यक्तींनी डोज घेतला. या वयोगटात २,८८४ व्यक्तींनी दुसरा डोज घेतला. यामध्ये कोविशिल्ड २,२३९ व कोव्हॅक्सिनचा ६४५ व्यक्तींनी डोज घेतलेला आहे.