शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

कोरोना संक्रमणमुक्त दोन हजारांच्या उंबऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST

जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालावधीत १९८५ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन घरी सोडण्यात आले.

ठळक मुद्देदिलासा : ८० टक्के रुग्ण असिम्प्टमॅटिक, ६४ टक्के कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आतापर्यंत ३१३५ कोरोना संक्रमितांची नोंद झालेली असली तरी त्यापैकी १९८५ रुग्णांना उपचारानंतर संक्रमणमुक्त करण्यात आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. संक्रमणमुक्त झालेल्यांचे प्रमाण एकूण कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत ६४ टक्के आहे. यात सातत्याने वाढ होत आहे.जिल्ह्यात हाथीपुरा भागातील नागरिकाच्या मृत्यूपश्चात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ४ एप्रिलला पहिला संक्रमित व पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतरच्या ११८ दिवसांत जिल्ह्यात ३१३५ संक्रमित अन् ८९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याच कालावधीत १९८५ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषित करण्यात येऊन घरी सोडण्यात आले. या नागरिकांना पुढील किमान सात दिवस गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. या आशयाचे हमीपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांद्वारे कोरोनामुक्त झालेल्यांकडून घेतले जाते.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ८० टक्के रुग्ण हे लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणांची असल्यामुळे त्यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था आदी ठिकाणी ठेवण्यात येत आहे. याशिवाय क्रिटीकल असलेल्या रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन आता तिवसा, वलगाव आदी ठिकाणी उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणाद्वारे देण्यात आली. आयसीएमआर व आरोग्य विभागाने दिलेल्या नव्या गाईडलाईननुसार रुग्णांवर उपचार होत आहेत. यामध्ये पाच दिवस उपचार व पाच दिवस निरीक्षणानंतर डिस्चार्ज देण्यात येत आहे.रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन, पोलीस व आरोग्य यंत्रणांचे सहकार्य यामुळे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाकाळात दिलासा देणारी ही बाजू ठरली आहे.- प्रशांत रोडेआयुक्त महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या