अमरावती : जिल्ह्यात शनिवारी तीन कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांचे मृत्यूची संख्या ६२४ झाली आहे. याशिवाय शनिवारी ३८० अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४४,९३८ झालेली आहे.
शहरात रविवारी राज्यसेवा परीक्षा असल्याने केंद्रावरील प्रक्रियेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत चाचण्यांची संख्यावाढ झाल्याचे दिसून आहे. शनिवारी आतापर्यंतच्या उच्चांकी ४,६८८ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये जिल्ह्यास दिलासाजनक अशी ८.१० टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झालेली आली.
दरम्यान, जिल्ह्यात २० पथकांद्वारा दंडात्मक कारवाया सुरू आहे. याशिवाय महापालिका पथकांद्वाराही शहरांत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरूच आहे. मात्र, शहरातील इतवारा बाजार परिसरात अजूनही बहुतेक आस्थापनांमध्ये त्रिसूत्रीचे पालन होताना दिसत नाही. प्रशासनाद्वारा या भागात दंडात्मक कारवाया कमी प्रमाणात होत असल्याने. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे.
बॉक्स
शनिवारचे कोरोनामृत्यू
०००००००००
००००००००००००००००