शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात कोरोना सुसाट; काँटॅक्ट ट्रेसिंग नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

ग्रामीण भागात कोरोना चाचणीवर  मर्यादा असून रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग करण्याचे प्रमाणही कमी असल्याने कोरोना वेगाने वाढतो आहे. टेस्टिंग, टेसिंग  ट्रीटमेंट  अशी त्रिसूत्री कोरोनावर मात करण्यासाठी असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही.

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणा तोकडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाची स्थिती शहरापेक्षा ग्रामीण भागात दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. गावांमध्ये होम आयसोलेशन शहरांमध्ये कोरोना चाचणीसाठी विशेष तपासणी मोहीम राबविली जात असून शहरात महापालिकेने फिरते पथकही सुरू केले आहेत. ग्रामीण भागात कोरोना चाचणीवर  मर्यादा असून रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची ट्रेसिंग करण्याचे प्रमाणही कमी असल्याने कोरोना वेगाने वाढतो आहे. टेस्टिंग, टेसिंग  ट्रीटमेंट  अशी त्रिसूत्री कोरोनावर मात करण्यासाठी असली तरी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. परिणामी कोरोना रुग्ण वाढल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रण दिसत नाही. ग्रामीण भागांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्स आणि हॅण्ड सॅनिटायझर  या त्रिसूचा वापर आजही पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. यामुळे ग्रामीण भागात वेगाने पसरणाऱ्या कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य विभागाला कठोर पावले उचलावी लागणार आहेत.

गावामध्ये यांचा ‘वाॅच’ अपेक्षितजिल्हा आणि तालुका प्रमाणेच गावस्तरावरही कोरोना नियंत्रण दक्षता समिती आहे. समितीमध्ये सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांचा समावेश आहे. ही समिती बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनवर वॉच ठेवण्याचे काम करते. याशिवाय आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्यामार्फत नियंत्रण ठेवावे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरजगावस्तरावर एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास अशा ठिकाणी  कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येते. तालुका आरोग्य अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी तपासणी मोहीम पूर्ण करताना आरोग्य विभागाची यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. 

ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. कॉन्टॅक्ट टेसिंग, काेविड केअर सेंटरमध्येही दाखल केले जात आहे. होमआयसोलेशन रुग्णावरही आरोग्य विभागाकडून लक्ष ठेवले जात आहे.- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या