शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, मेंदूज्वर झालेली विद्यार्थिनी कोमातून परतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

अमरावती : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर व इतर आजारांची लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थिनीवर आरोग्य ...

अमरावती : कोविड पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाल्यावर मेंदूज्वर व इतर आजारांची लक्षणे आढळून आलेल्या विद्यार्थिनीवर आरोग्य विभागाच्या कार्यतत्पर उपचाराने तिला पुनर्जन्म मिळाला आहे.

उपचारादरम्यान ही विद्यार्थिनी १५ दिवस कोमात होती. डॉक्टरांच्या देखरेखीत ऑक्सिजन पुरवठा, प्रयोगशाळेत विविध तपासण्या व त्यानुसार तत्पर औषधोपचाराने ती पूर्णत: बरी झालेली आहे. आपल्या लेकीला पुनर्जन्म मिळाल्याने वैद्यकीय सेवा देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया तिच्या कुटुंबीयांसह नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नेहा ही इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. काही दिवसांपूर्वी घरी अचानक भोवळ येऊन कोसळली. कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ डॉक्टरांकडे आणले. त्यावेळी तिला सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. तिची गंभीर प्रकृती लक्षात घेऊन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या स्टाफने तत्काळ उपचार सुरू केले. नेहाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्याने प्रथमत: तिच्यावर उपचार करण्यात आले.

दरम्यान, तिचा ताप १०४ डिग्रीपर्यंत वाढला होता. हे लक्षात घेऊन मेंदूचे सिटी स्कॅन, तसेच मेंदू व पाठीतील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. तपासणी अंती मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आणि उपचार करण्यात आले. नेहा सलग १५ दिवस कोमात होती. अशा स्थितीतही डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला कोमातून बाहेर काढले. सद्यस्थितीत तिची प्रकृती सुधारलेली आहे.

कोट

कोविडबाधित व मेंदूज्वरासह इतर आजारांची लक्षणांमुळे कोमात गेलेली बालिका पूर्णत: बरी झाली आहे. डॉक्टर, पारिचारिका व इतर स्टाफच्या एकत्रित प्रयत्नांतून तिला पुनर्जन्म मिळाला आहे.

- डॉ. श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक

बॉक्स

सुपरस्पेशालिटीमधून मिळाला डिस्चार्ज

नेहला शनिवारी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधून घरी परतण्याची परवानगी मिळाली. येथील स्टाफने तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत तिला आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात डॉ. रवी भूषण, डॉ. नीलेश पाटील, डॉ. पूनम सोलंकी, डॉ. श्रेया चेरडे, डॉ. करिश्मा जयस्वाल व डॉ. स्नेहल अतकरी या डॉक्टरांच्या टीमने नेहावर यशस्वी वैद्यकीय उपचार केले.