शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दिला मृत्युदंड, तरीही जाणूनबुजून ‘कायदेभंग’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

पान २ चे लिड इन डेप्थ स्टोरी प्रदीप भाकरे अमरावती : कोट्यवधी नागरिकांना झालेले कोरोना संक्रमण व पाठोपाठच्या लॉकडाऊनने ...

पान २ चे लिड

इन डेप्थ स्टोरी

प्रदीप भाकरे

अमरावती : कोट्यवधी नागरिकांना झालेले कोरोना संक्रमण व पाठोपाठच्या लॉकडाऊनने जसा देश आजाराच्या खाईत लोटला गेला, तशी संचारबंदी, जमावबंदी लागू झाली. त्यातच कोरोना हद्दपार करण्यासाठी त्रिसूत्री जाहीर करण्यात आली. साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या तरतुदीचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी आदेश पारित केले. त्यात सर्वाधिक बोलबाला राहिला तो पोलिसांनी दाखल केलेल्या भादंविच्या कलम १८८ चा. खून, अतिप्रसंग, दरोडा, चोरी आदी गुन्ह्यात ज्या कलमान्वये गुन्हे दाखल केले जातात, त्या कलमा सामान्यांच्याही अंगवळणी पडल्या. मात्र, १८८ म्हणजे काय, तो दाखल झाल्यावर काय कारवाई केली जाते, याबाबत जनसामान्य कमालीचे अनभिज्ञ आहेत.

विशेष म्हणजे, संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमरावती शहर पोलिसांनी २२ मार्च २०२० ते २१ जून २०२१ या सव्वा वर्षाच्या काळात कलम १८८ अन्वये तब्बल ४५१३ एफआयआर नोंदविले. यात मास्क नसणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, संचारबंदीच्या काळात वाहने चालविणे, अकारण फिरणाऱ्यांविरुद्ध भादंविचे कलम १८८ व साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ही कलम दाखल केलेले गुन्हे लोकांना कोरोनाकाळात ‘कायदेभंग’ करण्यापासून थांबवू शकले नाहीत. पोलीस आयुक्तालय हद्दीत ४२८९ वाहने जप्त करण्यात आली, तर ४५१३ प्रकरणांमध्ये तब्बल ६५८१ व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या संख्येनुसार कायद्याचा वापर करण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसून, गर्दी आवरताना आजही प्रशासनाच्या नाकीनऊ येत असल्याचे दृष्टीस पडत आहे.

------------------------

काय आहे भादंविचे कलम १८८?

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार आपत्तीकाळात काही नियम लागू होतात. शासनाने निर्देशित केलेले शासकीय अधिकारी या अनुषंगाने वेगवेगळे आदेश जारी करतात. या आदेशांची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तींवर भादंविचे कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो.

--------

असे आहे शिक्षेचे स्वरूप

कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा मिळू शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधित व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून मानवी जीवन वा आरोग्य धोक्यात सापडले, तर त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड वा दोन्ही शिक्षा मिळू शकतात.

--------------

लोक जुमानेनात

हा जामीनपात्र गुन्हा असून, शहरात मोठ्या संख्येने पोलिसांनी केलेल्या कारवाईचे आकडे समोर आले आहेत. येत आहेत. या गुन्ह्यांचे खटले काही महिन्यांनी कोर्टासमोर येतील. त्यातील काहींना दंड, शिक्षा मिळेल, तर काही निर्दोष सुटतील. मात्र, तब्बल ९७ लाख रुपये मोजूनही कोरोनाकाळात लोकांनी जाणूनबुजून कायदेभंग केला, ही निश्चितच काळजीची बाब आहे.

----------------

दाखल प्रकरणे- ४५१३

वाहने डिटेन : ४२८९

आरोपी -६५८१

दंडवसुली: ९७ लाख

------------------