- बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथील आयसोलेशन दवाखाना
- नेहरू मैदान स्थित महापालिका शाळा
- विलासनगर येथील महापालिका शाळा
- बडनेरा पोलीस ठाण्यालगत महापालिका शाळा
- दस्तुरनगर येथील आयुर्वेदिक महाविद्यालय
- दोन मोबाईल व्हॅन
---------------------
येथेही आरटी-पीसीआर, अँटिजेन तपासणी
जिल्हा सामान्य रुग्णालय
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय
-------------------
१४०५ खाटांचे १६ कोविड केअर सेंटर
जिल्ह्यात १६ ठिकाणी कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले असून, येथे १४०५ खाटांची सुविधा आहे. ३२१ खाटांवर कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. अद्यापही १०८४ खाटा रिक्त आहेत. यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी येथील पांढरी, परतवाडा येथील बुरडघाट, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर येथील सामदा, धामणगाव रेल्वे, धारणी, होशंगाबाद, मोर्शी, तिवसा, मोझरी, नांदगाव खंडेश्वर येथील प्रियदर्शिनी, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह, वलगाव येथील संत गाडगेबाबा, वरूड बेनोडा येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे.
------------------------
जिल्ह्यात डेडिकेडेट कोविड रुग्णालय- १७
डेडिकेडेट कोविड हेल्थ सेंटर- ३