अमरावती : जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार रविवारी एका रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला असून, ३०३ संक्रमित आढळून आले आहे.
चांदूर बाजारच्या ब्राम्हणवाडा थडी येथील ६० वर्षीय महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आतापर्यत मयतांची संख्या ६८७ वर पोहोचली आहे. ३०३ संक्रमित आढळून आले असताना रूग्णसंख्येचा आकडा ४९ हजार ८२६ वर पोहोचला आहे. रविवारी उपचारासाठी ८२६ रूग्ण दाखल असून, ५१३ जणांनी कोरोनावर मात करुन घरी बरे होऊन परतले आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात ८२२ तर, ग्रामीण भागात १४३४ ५ रूग्ण आहेत. ॲक्टिव्ह रूग्ण ३०८२ एवढे आहेत. रिकव्हरी रेट ९२.४४ टक्के, डब्लिंग रेट ५३, थेड रेट १.३८ टक्के एवढा आहे. आतापर्यत ३ लाख ३२ २९ हजार ७ नमुने तपासणी झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे ४ एप्रिल रोजी आगमन झाले हाेते. आता वर्षभरानंतर कोराेना रूग्ण संख्या ५० हजारांकडे वाटचाल सुरु झाली आहे. ५० हजारांचा रूग्ण संख्येचा पल्ला गाठण्यासाठी केवळ १७४ संक्रमित रूग्णांची नोंद होणे बाकी आहे.