शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

‘कोरोना’ : माहिती देण्यास ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असणारे सर्व रुग्ण शोधून त्यांच्या तपासणी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. ही मोहीम ६ एप्रिलपर्यंत राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी ही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला आव्हान : ताजनगर येथे महापालिका पथकाला धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या आदेशान्वये ‘अमरावतीकर मात करूया कोरोनावर’ विशेष मोहीम गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आली. ही मोहीम राबविणाऱ्या पथकाला ताजनगर येथे धक्काबुक्की झाली. कुठलीही माहिती देण्यास नकार मिळाला. कोरोना तपासणीच्या नावाखाली ‘सीएए’, ‘एनआरसी’ची नोंदणी सुरू असल्याची अफवा पसरल्याने हा प्रकार येथे घडला.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असणारे सर्व रुग्ण शोधून त्यांच्या तपासणी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. ही मोहीम ६ एप्रिलपर्यंत राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी ही वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत करण्यात येणार आहे. या चमूसोबत पोलीस पथक देण्यात आले. तथापि, पहिल्याच दिवशी तपासणी चमूला ताजनगर, छायानगर परिसरात नागरिकांचा नकार ऐकावा लागला. ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’चा पगडा कायम असल्याने आरोग्यविषयक माहिती सांगण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. दुसरीकडे झोपडपट्ट्यांमध्ये ‘कोरोना’ हा जीवघेणा असल्याची दहशत पसरल्याने गरीब, सामान्य नागरिक दारावर आलेल्या महापालिका चमूला व्यवस्थित सहकार्य करीत नसल्याचे चित्र गुरुवारी होते. तपासणी चमूसोबत सुरक्षेसाठी पोलीस तैनात होते. नागरिकांना मात्र त्यांच्याकडून बळाचा वापर केला जाण्याची धास्ती होती. यामुळे त्यांची भीती वाढली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त सुरेश पाटील, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, समाजविकास अधिकारी धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वात ही रुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.रुग्ण शोधमोहिमेचा पहिला दिवस होता. काही अडचणी असल्या तरी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून नागरिकांना या तपासणीचे गांभीर्य लक्षात आणून देऊ. ही मोहीम नागरिकांचे आरोग्य जोपासण्याकरिताच सुरू झाली आहे.- प्रशांत रोडेआयुक्त, महापालिका.तपासणीत भावी डॉक्टरांची सेवाकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रुग्ण तपासणी मोहीम युद्धस्तरावर चालविली आहे. गुरुवारी सकाळी ८ पासून शहराच्या विविध भागांत गृहभेटी घेत रुग्ण शोधले जात आहेत. या तपासणी चमूत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारे संचालित विदर्भ आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. हे भावी डॉक्टर महापालिका चमूसोबत रूग्ण शोधमोहिमेत सहभागी झाले आहेत.चमूकडून प्र-पत्राद्वारे माहिती गोळातपासणी चमू ही नागरिकांकडून विविध प्रकारची माहिती भरून घेत आहे. यात घर क्रमांक, कुटुंबातील सदस्यसंख्या, कुटुंबप्रमुखाचे नाव, संपर्क क्रमांक, वय, पुरुष अथवा महिला, विदेशातील वास्तव्य, देशाचे नाव, कोव्हिड-१९ विषाणूची लागण, कुटुंबात सदस्यांना असलेले विकार अशी विविध १० प्रकारची माहिती प्र-पत्रात भरून घेत आहे.२२ प्रभागांत वेगवेगळ्या चमूमहापालिका हद्दीत २२ प्रभागांमध्ये वेगवेगळ्या चमू रुग्ण तपासणीसाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत. २ ते ६ एप्रिल दरम्यान प्रभागनिहाय माहिती गोळा करून ती प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. एका चमूत वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, दोन शिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. सोबत एक पोलीस शिपाई देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या