शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST

सकाळी ७ ते ११ गर्दीच्या ठिकाणी नागरिकांवर कारवाईचा दंडुका अमरावती : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन सुरू करण्यात ...

सकाळी ७ ते ११ गर्दीच्या ठिकाणी नागरिकांवर कारवाईचा दंडुका

अमरावती : शहरासह जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी जीवनाश्यक वस्तू भाजीपाला आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. मात्र, दुपारनंतर लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले. दरम्यान पोलिसांमार्फत विनाकामाने फिरणाऱ्या वाहनचालकांवर व नागरिकांवर कारवाईचा दंडुका उगारला जात आहे.

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही शहर व परिसरात विनाकारण रस्त्यावरून नागरिकांची भटकंती सुरू आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावरून विनाकारण संचार करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन सुरू केले होते. मात्र, कोरोनाचे रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेतात १५ एप्रिलच्या रात्रीपासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार शहरासह जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी ही सकाळी जीवनाश्यक वस्तू भाजीपाला आणि अन्य साहित्याच्या खरेदीसाठी शहर परिसरात बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिसून आली. मात्र, दुपारनंतर शहर व परिसरातील वर्दळीच्या रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. तुरळक प्रमाणात रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याचे चित्र दिसत होते. बस थांब्यावर शुकशुकाट आहे.