शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

कोरोना : ‘ब्रेक द चेन’ जिल्ह्यासाठी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी, शेतीविषयक कामे सुरू अमरावती : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ‘रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी’ असे ...

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती, रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी, शेतीविषयक कामे सुरू

अमरावती : कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ‘रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी’ असे धोरण अवलंबविले आहे. शनिवार, रविवार असे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन अमरावती जिल्ह्यासाठी लागू असेल. ५ ए‌प्रिल रोजी रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी साेमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

- शेतीविषयक कामे सुरळीत

शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

------------

- रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी

राज्यात १४४ कलम लागू केले जाणार आहे. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

-------------

- बगीचे, उद्याने, सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत, असे लक्षात आले, तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

----------------

- आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल, बाजारपेठा, ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही, ते पाहावे.

---------------

- सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू

सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.

सार्वजनिक व खासगी बसमध्ये आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बस चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील, याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

-------------

वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.

--------------

शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती

शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत, तेथील कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असल्यास कार्यालय किंवा विभागप्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातील कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

-----------------

मनोरंजन, सलून बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर, क्लब, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क पूर्णपणे बंद राहतील.

----------------

प्रार्थनास्थळे दर्शनार्थीसाठी बंद

सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील. मात्र, याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरणदेखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे लागणार आहे.

------------

उपाहारगृहे, बार पूर्णतः बंद

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण, उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल, तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागतांसाठीच सुरू ठेवता येईल. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र, टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

-------------

खाद्यविक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र, नियमांचे पालन होत नाही, असे दिसले, तर स्थानिक प्रशासनाला ते पूर्णपणे बंद करता येईल

---------------

ई-कॉमर्स सेवा सुरू

ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे, अन्यथा त्या व्यक्तीस १००० रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस १० हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

------------------

वृत्तपत्रे छपाई, वितरण सुरू

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. मात्र, विक्रेत्यांना लसीकरण करून घ्यावे लागेल.

------------

शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र, दहावी व बारावीच्या परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

-------------

उद्योग, उत्पादन क्षेत्र सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील. मात्र, याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत, याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.

--------------

आजारी कामगाराला काढता येणार नाही

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणीच मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला, या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा व रजेच्या काळात पूर्ण पगार द्यावा लागेल. कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

--------------

- तर सोसायटी मिनी कंटेनमेंट

पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेनमेंट म्हणून घोषित होणार आहे. तसा फलक लागेल व बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी असणार आहे.

००००