शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

कोरोना @ ९०, आणखी एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:01 IST

बाधिताच्या संपर्कात आल्याने खरकाडीपुरा येथील महिलेला यापूर्वीच कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांना आता कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी मृत ताजनगरातील व्यक्ती देखील यापूर्वी त्यांच्याच कुटंबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाली होती.

ठळक मुद्देसंक्रमित खासगी डॉक्टरचा मृत्यू : बुधवारचे दोन कोरोनाग्रस्त ‘सारी’चेही रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात कोरोना विषाणू चांगलाच पाय पसरवित आहे. येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगतच्या खरकाडीपुरा भागातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने कोरोना ग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ताजनगरातील एक ४४ वर्षीय पॉझिटिव्ह खासगी डॉक्टर गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दगावल्याने मृतांची संख्या १३ झालेली आहे. सद्यस्थितीत ५६ कोरोनामुक्त, तर २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.बाधिताच्या संपर्कात आल्याने खरकाडीपुरा येथील महिलेला यापूर्वीच कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांना आता कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी मृत ताजनगरातील व्यक्ती देखील यापूर्वी त्यांच्याच कुटंबातील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाली होती. त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी कोरोनामुक्त करण्यात येणार होते. मात्र, त्यांचा अहवाल वेळेच्या आत न आल्याने त्यांना थांबविण्यात आले व गुरुवारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.बुधवारी पॉझिटिव्ह आलेले लालखडीतील ६५ वर्षीय व्यक्ती व नांदगाव पेठ तेथील ६० वर्षीय महिला ‘सारी’चे रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. सर्दी, ताप व खोकला आदी कोरोनासदृश लक्षणे असल्याने त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविला असता, ते संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयातील दुसºया माळ्यावरील कक्षात हलविले आहे. आतापर्यंत चार ‘सारी’चे रुग्ण हे कोविड-१९ चे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी दोन व्यक्तींचा मृत्यूदेखील झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान बाधिताच्या घराकडे जाणारे मार्ग यंत्रणेद्वारा बंद करण्यात आलेले आहे. या भागात निर्जंर्तकीकरणाची फवारणी करण्यात आली व आरोग्य पथकाद्वारा सर्व्हे सुरू झालेला आहे. खरकाडीपुरा प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत ‘सारी’चे ६५ रुग्ण निष्पन्नकोरोनाच्या प्रादुर्भावाने दीड महिन्याच्या कालावधीत झालेल्या आरोग्य तपासणीत ‘सारी’चे ६० ते ६५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू, तर तीन रुग्णांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारपासून शहरासह जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचा सर्व्हे सुरू झाला. यामध्ये सारी, इली, यासोबतच सर्दी, ताप, खोकला व हायरिस्कचे रुग्ण व गर्भवती स्त्रियांची माहिती घेण्यात येत आहे. यासोबतच पथकाद्वारा जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.अंबिकानगर, बेलपुरा कटेंनमेंट झोन नाहीयेथील कोविड रुग्णालयातील दोन व्यक्ती बुधवारी पॉझिटिव्ह आल्यात. मात्र, या दोन्ही व्यक्ती कोविड रुग्णालयातील त्यांच्या सेवेनंतर क्वारंटाईनमध्ये होत्या. दरम्यान चार ते पाच दिवसांनंतर त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आलेले आहे. या दहा ते २१ दिवसांच्या अवधीत त्यांचा थेट संपर्क, त्यांचे वास्तव्य असणाऱ्या अंबिकानगर व बेलपुरा भागाला आलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भाग कटेनमेंट झोन जाहीर करण्यात येणार नाही. मात्र, दक्षतेचा उपय म्हणून त्यांच्या परिवारातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या